येवा कोकण आपलोच आसा! मात्र छाया कदम यांनी व्यक्त केली खंत

 पायल कपाडिया दिग्दर्शित त्याचा मल्याळम चित्रपट 'ऑल वी इमॅजिन ॲज लाइट' हा कान्स येथील मुख्य विभागात (पाल्मे डी'ओर) प्रदर्शित होणारा पहिला भारतीय चित्रपट आहे. 

Updated: May 31, 2024, 06:58 PM IST
येवा कोकण आपलोच आसा! मात्र छाया कदम यांनी व्यक्त केली खंत title=

मुंबई :  'मडगाव एक्सप्रेस' मधील कांचन कोंबडी आणि 'लापता लेडीज'मधील मंजू माई या भूमिकेसाठी ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री छाया कदम यांनी 2024 च्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पदार्पण केलं. पायल कपाडिया दिग्दर्शित त्याचा मल्याळम चित्रपट 'ऑल वी इमॅजिन ॲज लाइट' हा कान्स येथील मुख्य विभागात (पाल्मे डी'ओर) प्रदर्शित होणारा पहिला भारतीय चित्रपट आहे. 1994 मध्ये प्रदर्शित झालेला 'स्वहम' हा शेवटचा चित्रपट होता. नुकतीच ही अभिनेत्री कान्समधून भारतात परतली आहे. यानिमीत्ताना आम्हाला दिलेल्या मुलाखतीत छाया यांनी अनेक खुलासे केले आहेत. 

आम्हाला दिलेल्या मुलाखतीत छायाला कोकणातून कश्या प्रतिक्रीया येतायेत असा प्रश्न विचारण्यात आला. यावर छाया खंत व्यक्त करत म्हणाल्या, '''कोकणातून खरंतर काय म्हणजे आमच्या ईथे थिएटर नाहीयेत. माझं गाव धामापूर आहे. सिनेमा बघायला जायचं असेल तर कणकवलीत जावं लागतं. त्यामुळे तो एवढा प्रवास आणि तो एवढा खर्च हे सगळं गणित मांडलं तर हे सगळं लोकांना परवडत नाही जाणं. त्यामुळे मी जरी तिथली आहे पण माझे सिनेमा तिथे बघायला जाणं लोकांना परवडत नाही. त्यामुळे तिथली लोकं माझी टीव्हीवर येण्याची वाट बघतात आणि भेटल्यावर म्हणतात, टीव्हीवर काम कर ना तु! टीव्हीवर काम का करत नाहीस. असा त्यांचा माझ्याकडे बालिश हट्ट असतो. प्रेम तर आहेच पण आम्ही थिएटरला जाऊ शकत नाही. त्यामुळे आम्हाला तुला बघायचं असेल तर तु टीव्हीवर ये असं कोकणातल्या लोकांचा हट्ट माझ्याकडे नेहमी असतो.'' असं छाया कदम यांनी आम्हाला दिलेल्या मुलाखतीत म्हणल्या.'

छाया कदम यांनी अत्तापर्यंत अनेक सिनेमात काम केलंय. अनेक मराठी तसंच हिंदी सिनेमा छाया यांनी गाजवले आहेत. छाया यांनी कान्स गाजवल्यानंतर भारतात परतल्या आहेत. कान्समध्ये त्यांच्या लूकपासून ते त्यांना मिळालेला स्टॅंडिंग ओवेशनने अनेकांची मने जिंकली.