भरघोस यशानंतर तान्हाजी टॅक्स फ्री

रूपेरी पडद्यावर 'तान्हाजी द अनसंग वॉरियर' चित्रपटाची चर्चा सुरू आहे. 

Updated: Jan 15, 2020, 08:35 PM IST
भरघोस यशानंतर तान्हाजी टॅक्स फ्री

मुंबई : सध्या रूपेरी पडद्यावर 'तान्हाजी द अनसंग वॉरियर' चित्रपटाची चर्चा सुरू आहे. बॉक्स ऑफिसवर देखील चित्रपट दमदार कमाई करताना दिसत आहे. १० जानेवारी रोजी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. तर आता उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने 'तान्हाजी' चित्रपट टॅक्स फ्री केला आहे. त्यामुळे अभिनेता अजय देवगन स्टारर 'तान्हाजी' चित्रपट येत्या काळात दमदार कमाई करेल यात काही शंका नाही. 

१० जानेवारी रोजी 'तान्हाजी' आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण स्टारर 'छपाक' चित्रपट प्रदर्शित झाला. तर या दोन दोन तगड्या कलाकारांच्या चित्रपटांमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळाली. तर या शर्यतीत अजयच्या 'तान्हाजी'
चित्रपटाने बाजी मारली आहे. 

रविवारी या चित्रपटाने २६.०८ कोटींचा गल्ला जमवला ज्यामुळे आता या चित्रपटाच्या कमाईचे आकडे ६१.७५ कोटी रुपयांवर पोहोचले आहेत. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरच्या माध्यमातून या चित्रपटाच्या कमाईचे आकडे सर्वांसमोर आणले.

अजय देवगनचा हा १००वा सिनेमा आहे. तसेच अजय देवगन आणि काजोल तब्बल १० वर्षांनंतर एकत्र काम करत आहे. अजय देवगनच्या तोडीला तोड असा अभिनेता सैफ अली खानची भूमिका देखील वाखाण्याजोगी आहे.

तान्हाजी चित्रपट भारतात ३ हजार ८८० रूपेरी पडद्यावर प्रदर्शित करण्यात आला असून संपूर्ण जगात ४ हजार ५४० पडद्यांवर चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे. ओम राऊत यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.