Youtuber Armaan Malik Rape Case : युट्यूबर अरमान मलिकची 'बिग बॉस ओटीटी 3'मधून एक्झीट झाली आहे. अरमान जेव्हा शोमध्ये गेला तेव्हा एका मुद्द्यावर चर्चा सुरु होती. तो म्हणजे त्याच्यावर असलेल्या बलात्काराच्या आरोपाची. या तक्रारीची कॉपी देखील सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. अनेक सेलिब्रिटी आणि इतर लोकांना यावर अरमान मलिकचा विरोध केला आहे. सगळ्यांना या प्रकरणात अरमानच्या प्रतिक्रियेची प्रतिक्षा होती. आता शोमधून बाहेर आल्यानंतर अरमानला याविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अरमाननं काय प्रतिक्रिया दिली ते जाणून घेऊया.
अरमाननं 'एबीपी'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की 'मला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. हे प्रकरण अजून कोर्टात आहे. त्यामुळे या प्रकरणात मला कोणतीही कमेंट करायची नाही. न्यायालयाचा निर्णय येताच सगळ्यांना कळेल की काय होणार, नक्की काय झालं होतं आणि काय सुरु आहे.'
अरमानला शोनंतर आता पुढे काय करण्याचा प्लॅन आहे त्याविषयी विचारता त्यानं उत्तर दिलं की मी माझा व्लॉग कंटीन्यू करेन आणि काही ना काही मी तुम्हाला रोज दाखवत राहिन.
त्यानंतर अरमान मलिकला विचारण्यात आलं की फायनलसाठी तुझ्या कुटुंबातून कोण-कोण आलं आहे. तर त्यावर उत्तर देत अरमाननं सांगितलं की संपूर्ण कुटुंब हे मुंबईत पोहोचलं आहे.
अनेकदा बिग बॉसविषयी प्रश्न उपस्थित करण्यात येतात की हा शो स्क्रिप्टेड आहे का तर त्यावर अरमाननं उत्तर दिलं की 'मला स्वत: ला वाटायचं की बिग बॉस हे स्क्रिप्टेड आहे आणि तिथे जाणून माझे डोळे उघडले. जर कोणी म्हणालं की हा शो स्क्रिप्टेड आहे तर मला त्या व्यक्तीला नक्कीच भेटायचं आहे.'
बिग बॉस ओटीटीविषयी बोलायचे झाले तर अरमानची दुसरी पत्नी क्रितिका मलिक ही शोमध्ये आहे आणि तिच्यासोबत रणवीर शौरी, साई केतन राव, सना मकबूल आणि नेजीसोबत टॉप 5 मध्ये तिनं तिचं स्थान मिळवलं आहे. आता शोमध्ये कोण जिंकणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.