युट्यूबर अरमान मलिकने (Armaan Malik) 'बिग बॉस ओटीटी 2'मध्ये दोन्ही पत्नी पायल आणि कृतिका यांच्यासह हजेरी लावली तेव्हा एकच खळबळ उडाली होती. संपूर्ण देशभरात या गोष्टीचं आश्चर्य व्यक्त करण्यात आलं की, एक व्यक्ती इतक्या जाहीरपणे आपल्या दोन पत्नींना कसं काय दाखवू शकतो. अरमानने पायल मलिकशी पहिलं लग्न केलं होतं. यानंतर त्याचं पायलची बहिण कृतिकावर प्रेम जडलं. अरमानच्या दाव्यानुसार, नवं नात सुरु करण्याआधी त्याने पहिली पत्नी पायलकडून परवानगी घेतली होती.
दरम्यान आपल्या दोन लग्नांमुळे चर्चेत आलेल्या अरमान मलिकच्या चौथ्या लग्नाच्या शक्यतांची चर्चा सुरु झाली आहे. नेटकऱ्यांनी आपला दावा खरा करण्यासाठी पुरावेही शोधले आहेत. सोशल मीडियावरील व्हायरल वृत्तांच्या मते, अरमान मलिकच्या मुलांची देखभाल करणाऱ्या महिलेने अरमानशी करवा चौथ ठेवला होता.
लोकांनी अरमान मलिकने चौथ्यांदा लग्न केलं आहे का? याची माहिती गोळा करण्यास सुरुवात केल्याने यामुळे खळबळ उडाली. लक्ष्य मलिक कुटुंबाच्या खूप जवळ आहे आणि त्यांच्या सर्व व्लॉग्समध्ये त्यांच्यासोबत नेहमीच दिसते. जीम आणि इतर सुट्टीच्या दिवशीही ती त्यांच्यासोबत असते. करवा चौथच्या व्लॉगमध्ये, अरमान मलिक आपल्या पत्नींसाठी तीन भेटवस्तू आणताना दिसला. त्यातून त्याने दोन अंगठ्या काढून दिल्या आणि तिसरी अंगठी बाजूला ठेवली. यामुळे लक्ष्य अरमानची तिसरी पत्नी म्हणून मलिक कुटुंबासोबत राहत होती की काय अशी चर्चा रंगली आहे.

ही चर्चा सुरु होताच सोशल मीडियावर पुन्हा एकदा व्हिडीओ शेअर केला जात आहे. अरमानच्या या कृत्यामुळे लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत. एका युजरने लिहिलं आहे की, "पायल आजकाल खूप उदास दिसत आहे, कदाचित त्यामुळेच ती सध्या याचा खुलासा करत नाहीये." तर दुसऱ्याने कमेंट केली, "अरे देवा हे काय कुटुंब आहे." एका चाहत्याने लिहिले की, "मला खात्री आहे की ही महिला लक्ष्य मलिक कुटुंबातील गोंधळात सामील आहे.
शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे.
...Read More
LIVE|
WI
(10 ov) 32/2 (75 ov) 205
|
VS |
NZ
278/9(74.4 ov)
|
| Full Scorecard → | ||
LIVE|
IND
213/4(20 ov)
|
VS |
SA
37/3(4.4 ov)
|
| Full Scorecard → | ||
|
PHI
(20 ov) 182/5
|
VS |
INA
104(18.5 ov)
|
| Philippines beat Indonesia by 78 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
SIN
(20 ov) 156/8
|
VS |
THA
152/9(20 ov)
|
| Singapore beat Thailand by 4 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
PHI
(20 ov) 145/9
|
VS |
SIN
131/6(20 ov)
|
| Philippines beat Singapore by 14 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.