Zee Chitra Gaurav 2023: 'अशोक सराफ म्हणजे...', झी चित्रगौरव पुरस्कार सोहळ्यात मराठी कलाकार Emotional, मामांच्याही डोळ्यात पाणी

Zee Chitra Gaurav 2023: यंदाचा झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा हा खूप गाजणारा असणार आहे. कारण अनेक जेष्ठ कलाकारांसोब तरुण पिढीतल्या कलाकारांचा देखील गौरव केला जाणार आहे. 

Updated: Mar 23, 2023, 10:34 AM IST
Zee Chitra Gaurav 2023: 'अशोक सराफ म्हणजे...', झी चित्रगौरव पुरस्कार सोहळ्यात मराठी कलाकार Emotional, मामांच्याही डोळ्यात पाणी title=
Zee Chitra Gaurav 2023 comedy king veteran actor ashok saraf

Zee Chitra Gaurav Awards : यंदाचा झी चित्र गौरव पुरस्कार (Zee Chitra Gaurav Awards) सोहळा हा खूप गाजणार आहे. कारण अनेक जेष्ठ कलाकारांसोब तरुण पिढीतल्या कलाकारांचा देखील गौरव केला जाणार आहे. तसेच अनेक दिग्गज कलाकारांचे धमाकेदार परफॉर्मन्स पाहता येणार आहे. या सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे अभिनयाचे विद्यापीठ समजल्या जाणाऱ्या अशोक सराफ यांना यंदाचा झी मराठी चित्रगौरव 2023 चा जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. या सोहळ्यादरम्यान अशोक सराफ (Ashok Saraf) यांच्यासह मराठी कलाकारही इमोन्शनल झाल्याचे पाहायला मिळालं. नेमकं या चित्रगौरव सोहळ्यात असं काय घडलं की अशोक मामा यांच्या डोळ्यात पाणी आले...... 

यंदाचा झी चित्रगौरव पुरस्कार (Zee Chitra Gaurav 2023) सोहळा येत्या रविवारी म्हणजे 26 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता झी मराठी (zee marathi) वाहिनीवर प्रसारित होईल. या पुरस्कार सोहळ्यात मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ आणि लोकप्रिय अभिनेते अशोक सराफ  (Ashok Saraf) यांना त्यांनी सिनेमासृष्टीत दिलेल्या योगदानाबद्दल जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यंदाचा झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा खूपच अविस्मरणीय झाला आहे. या सोहळ्यात अनेक दिग्गड कलाकारांनी धमाकेदार परफॉर्मन्स दिले आहे. तसेच मराठीतली सहाबहार आवडती जोडी सचिन पिळगावक आणि सुप्रिया पिळगावकर बऱ्याच काळानंतर एकत्रित धमाकेदाग सादरीकरण करणार आहेत. 

तसेच या सोहळ्याचे एख वैशिष्ट्य म्हणजे यंदाच्या जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी अभिनय सम्राट अशोक सराफ  (Ashok Saraf) ठरले आहेत. अशोक मामा म्हणून चित्रपटसृष्टीत त्यांची ओळख आहे. खळखळून हसवणारे आणि तेवढेच अंतर्मुख करणारे अशोक मामा यांनी पन्नासच्या वर हिंदी सिनेमे, दोनशेच्या आसपास मराठी सिनेमे, पंधरा टीव्ही मालिका, पंचवीस नाटकं आणि पुरस्काराचे अर्धशतक इतका प्रचंड अभिनयाच्या क्षेत्रात त्यांचा प्रवास झाला आहे. या सोहळ्यात नवख्या कलाकाराला अभिनय शिकायला कुठल्या शाळेत जायची गरज नाही. अशोक सराफ नावचं अभिनयाचे विद्यापीठच आहे, केवळ बघत राहिलो तरी खूप काही शिकण्यासारखं आहे. अशा या दिग्गड अभिनेत्याच जीवन प्रवास अभिनेता सिद्धार्थ जाधवने आपल्या नृत्याविष्कारातून उलगडून दाखवत त्यांना अनोखी मानवंदना दिली. हा क्षण बघताच अशोक सराफ यांच्यासह मराठी कलाकारांच्या डोळ्यात पाणी आलं. 

या सोहळ्यात अशोक मामा यांना मराठीतील आघाडीच्या अभिनेत्यांच्या हस्ते सन्मानपत्र देण्यात आले. त्यामध्ये अशोक मामा, आमच्या आयुष्यातले अनेक क्षण सुंदर केलेत तुम्ही. अशाच आणखी अजरामर भूमिका करण्यासाठी तुम्हाला दीर्घ आणि निरोगी आयुष्य लाभो हीच प्रार्थना.. तुमच्या अभिनयाला आणि सच्चेपणाला झी मराठी परिवारातर्फे मानाचा मुजरा! अशा शब्दात झी मराठीने अशोक मामांना मानवंदना दिली आहे.