close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

1995ची विश्वसुंदरी चेल्सी स्मिथचं निधन, सुष्मितासेनची भावनिक पोस्ट

1995 ची विश्वसुंदरी 

1995ची विश्वसुंदरी चेल्सी स्मिथचं निधन, सुष्मितासेनची भावनिक पोस्ट

मुंबई : सुष्मिता सेनने 1994 मध्ये विश्व सुंदरीचा किताब जिंकून भारताचं नाव मोठं केलं. तिचा हा प्रवास सुष्मिताने अनेक मुलाखतीत शेअर केला आहे. मात्र आता अशी घटना घडली आहे ज्यामुळे सुष्मिता सेन भावूक झाली आहे. तिने आपल्या दुःखाचं कारण सोशल मीडियावर शेअर केलं आहे. 

सुष्मिताने ट्विट केलं आहे की, मला त्यांच हास्य आणि व्यक्तीमत्व भरपूर लोकप्रिय होतं. माझ्या मैत्रिणीच्या आत्माला शांती लाभो. मिस युनिव्हर्स 1995 स्मिथ यांच निधन झालं आहे. या संदर्भात सुष्मिताने भावूक पोस्ट शेअर केली आहे. यासोबत एक फोटो देखील आहे ज्यामध्ये स्मिथ मिस यूनिव्हर्सचा ताज घालत आहे. स्मिथ गेल्या काही दिवसांपासून लिव्हर कॅन्सरने ग्रस्त होत्या. शनिवारी 45 वर्षीय स्मिथ यांच निधन झालं. 

सुष्मिता सेन 1994 मध्ये मिस युनिव्हर्स झाली तर स्मिथ 1995 मध्ये. आपण फोटोत पाहू शकतो की, परंपरेनुसार सुष्मिता आपल्यानंतरच्या मिस युनिव्हर्सला तो मुकूट घालत आहे.