'कट्टी बट्टी'मध्ये पूर्वाचा लग्न करण्याचा निर्णय चूक की बरोबर?

तुम्हाला काय वाटतं? 

'कट्टी बट्टी'मध्ये पूर्वाचा लग्न करण्याचा निर्णय चूक की बरोबर? title=

 मुंबई : कट्टी बट्टी या मालिकेत प्रेक्षक सध्या छोट्या शहरातील मुलगी पूर्वाची द्विधा मनस्थिती अनुभवत आहेत. एकीकडे तिच्या लग्नाची लगबग  सुरु आहे आणि दुसरीकडे तिची पीएचडी पूर्ण करण्यासाठी धावपळ सुरु आहे. सोमवार तेशनिवार संध्याकाळी ७.३० वाजता प्रसारित होणाऱ्या या मालिकेत प्रेक्षकांनी पाहिले की, पूर्वा परागशी लग्न करण्यास होकार देते कारण पराग तिला पीएचडी साठी मदत करत असतो. त्यानंतर सगळे त्यांच्या साखरपुड्याच्यातयारीला लागतात.  

ते दोघे साखरपुड्याच्या अंगठीच्या खरेदीसाठी जाणार असतात, पण परागला कॉलेजमध्ये एक्स्ट्रा लेक्चर करावं लागतं म्हणून त्याला उशीर होतो . पराग येई पर्यंत पूर्वाला थांबावं लागतं नंतर खरेदीसाठी देखील उशीर होतो आणिपरिणामी पूर्वाला तिच्या पीएचडीच्या क्लासला जायला ही उशीर होतो.त्याच दिवशी पूर्वाला पठारे सरांकडे प्रेझेंटेशन करायचे असते. पण तिला उशीर झाल्यामुळे सर तिला खूप ओरडतात आणि त्यामुळे ती त्यांना तिचे आप्पा आजारीअसल्यामुळे तिला उशीर झाल्याचे खोटे कारण सांगते.

सध्या मालिकेत पूर्वा निराश झालेली दिसून येत आहे कारण लग्नाच्या तयारीत तिचा जास्त वेळ जात असल्यामुळे तिला पीएचडीकडे लक्ष देता येत नाही. पूर्वा आता अशापरिस्थितीत आहे की तिला लग्नाच्या तयारीसाठी पीएचडीचा क्लास बंक करावा लागत आहे. आणि तिला अभ्यासाकडे काहीही झाले तरी दुर्लक्ष करायचे नाही, त्यामुळे ती आता तिच्या निर्णयाचा पुन्हा विचार करू लागली आहे.