2050पर्यंत अल्झायमर रुग्णांची संख्या वाढण्याची भीती; WHOचा इशारा, उपाय आणि लक्षणे जाणून घ्या

 अल्झायमर (Alzheimer) हा रोग न्यूरोलॉजिकल डिसऑर्डपपैकी एक आहे. यामध्ये मेंदूच्या पेशी कमी होऊ लागतात. त्यामुळं गोष्टी लक्षात ठेवणे, वस्तू विसरणे हळूहळू याचे प्रमाण इतके वाढते की संबंधित व्यक्ती घरातील व्यक्तींचे चेहरेही विसरायला लागतो. वृद्धापकाळात या आजाराची तीव्र लक्षणे दिसण्यास सुरुवात होतात. मात्र, आत्ता संशोधनानुसार तरुण वयातही या आजाराची लक्षणे जाणवू शकतात. अल्झायमर रोगाचा तुमच्या रोजच्या जीवनशैलीवर, कुटुंबावर याचा परिणाम होऊ शकतो. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jul 4, 2023, 01:52 PM IST
2050पर्यंत अल्झायमर रुग्णांची संख्या वाढण्याची भीती; WHOचा इशारा, उपाय आणि लक्षणे जाणून घ्या title=
2050पर्यंत अल्झायमर रुग्णांची संख्या वाढण्याची भीती; WHOचा इशारा, उपाय आणि लक्षणे जाणून घ्या|153 million people will be living with Alzheimer's disease by 2050

Alzheimer's Disease In Marathi: अल्झायमर (Alzheimer) हा रोग न्यूरोलॉजिकल डिसऑर्डपपैकी एक आहे. यामध्ये मेंदूच्या पेशी कमी होऊ लागतात. त्यामुळं गोष्टी लक्षात ठेवणे, वस्तू विसरणे हळूहळू याचे प्रमाण इतके वाढते की संबंधित व्यक्ती घरातील व्यक्तींचे चेहरेही विसरायला लागतो. वृद्धापकाळात या आजाराची तीव्र लक्षणे दिसण्यास सुरुवात होतात. मात्र, आत्ता संशोधनानुसार तरुण वयातही या आजाराची लक्षणे जाणवू शकतात. अल्झायमर रोगाचा तुमच्या रोजच्या जीवनशैलीवर, कुटुंबावर याचा परिणाम होऊ शकतो. 

अल्झायमरची सुरुवात मेंदूमध्ये झाल्यानंतर जवळपास 10 वर्षांनंतर त्याची लक्षणे दिसू लागतात, असा तज्ज्ञांचा अभ्यास आहे. तसंच, वयाच्या 65 वर्षानंतर 20 टक्के लोकांमध्ये अल्झायमर होण्याची शक्यता असते, असा अंदाज बांधला जात आहे. अद्याप अल्झायमरवर कोणताही ठोस उपाय व औषधे सापडली नाहीयत. त्यामुळंच हा रोग दुर्धर समजला जातो. जागतिक आरोग्य संघटनाने एक धोक्याचा इशारा दिला आहे. 

जागतिक आरोग्य संघटनेनुसार, 2050पर्यंत अल्झायमरच्या रुग्णांची संख्या तीन पट अधिक होणार आहे. संशोधनकर्त्यांच्या मते, वय, जेनेटिक्स, बदलती जीवनशैली यामुळं अल्झायमर होण्याचा धोका होऊ शकतो. शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, अधूनमधून उपवास केल्यास अल्झायमरवर रोखण्यास मदत होऊ शकते, असा दावा करण्यात येत आहे. संशोधकांनी त्यासाठी उंदरावर एक प्रयोग केला होता. उंदरांच्या ब्रेन सेल्सचा अभ्यास केल्यानंतर त्याने असे आढळून आले की 48 तास त्यांना काहीही खायला दिले नाही. त्यानंतर त्यांच्या ब्रेन सेल्सची तपासणी केली असता मेंदूच्या पेशींना संरक्षण मिळाल्याचे आढळले.

अल्झायमर डिसीजबद्दल सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास विसरभोळेपणा वाढत जातो. पहिले पहिले नाव विसरणे नंतर नाती विसरणे, जेवण खाणे विसरणे अशाप्रकारे लक्षणांमध्ये वाढ होत जाते. सुरुवातीला घरातल्या इतरांना हा अगदी थट्टा मस्करीचा विषय होतो. रोगाचे गांभीर्य कळू लागले की डॉक्टरांकडे धाव घ्यावी लागते. 

अल्झायमर होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी

अल्झायमर होऊ नये याची काळजी तरुण वयातच घेण्याची गरज आहे. नियमित व्यायाम करावा, सकस – हलका व आपल्याला पचेल असाच आहार घ्यावा, ताजी फळे – पालेभाज्या खाव्यात, आनंदी व उत्साही वातावरण ठेवावे असे काही उपाय सांगितले जातात. वास्तविक हे उपाय सर्वसाधारण प्रकृती उत्तम ठेवण्यासाठी पण सांगितले जातात. अल्झायमर डिसीज वर हमखास उपयोग होईल असा काही इलाज आजतागायत आधुनिक वैद्यक शास्त्रात नाही.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)