मुंबई : घडाळ्याच्या काट्यावर नाचणारी आणि मोबाईलवर चालणारी आजची नवी पीढी वजनाच्या काट्यावर चढली की त्यातील अनेकाजण हैराण होतात. कारण नियंत्रणात नसणाऱ्या वजनामुळे भल्याभल्यांना घाम फुटतो. त्यावर काही ना काही उपाय करत असतात. पण अनेकदा त्याचा परिणाम जाणवायला वेळ लागतो. तर काहींना कठोर व्यायाम, डायटिंग करणे जमत नाही. या साऱ्यातून बाहेर पडण्यासाठी आणि घरच्या घरी वजन कमी करण्याचा अगदी सोपे उपाय.... तुमच्या नक्कीच कामी येतील...
# रिकाम्या वेळात अनेकजण टी.व्ही. बघतात किंवा फोनवर वेळ वाया घालवतात. असा रिकामा वेळ एखाद्या अॅक्टिव्हिटीमध्ये व्यतीत करा. म्हणजे घरातल्या घरातच चाला किंवा जपिंग जॅक सारखे व्यायामप्रकार करा. त्यामुळे व्यायामही होईल आणि मूडही फ्रेश होईल. परिणामी वजन कमी होण्यास मदत होईल.
# घरी किंवा ऑफिसमध्ये लिफ्टऐवजी जिन्याचा वापर करा. असे केल्याने तुम्ही वजनावर नियंत्रण मिळवू शकता.
# आजकाल बाजारात कॉफीचे विविध प्रकार उपलब्ध आहेत. हे प्रकार अनेकांना विशेषतः तरुणांमध्ये लोकप्रिय आहेत. पण वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी साधी कॉफी पिण्याची सवय लावून घ्या.