'या' 5 आयुर्वेदिक औषधी वनस्पती शिरा करतील उघड, औषधाशिवाय खराब कोलेस्ट्रॉलपासून मिळेल आराम

Herbs For High Cholesterol : आयुर्वेदात असे अनेक औषधी वनस्पती आहे ज्यांच्या सेवनामुळे अनेक गंभीर आजारात आराम मिळतो, असं तज्ज्ञांचं मत आहे. आयुर्वेदात असे 5 औषधी वनस्पती आहेत ज्यांच्या सेवनातून खराब कोलेस्ट्रॉलवर उपचार करता येतो, असं आयुवर्देत तज्ज्ञांनी सांगितलंय.     

नेहा चौधरी | Updated: Jun 2, 2024, 04:43 PM IST
'या' 5 आयुर्वेदिक औषधी वनस्पती शिरा करतील उघड, औषधाशिवाय खराब कोलेस्ट्रॉलपासून मिळेल आराम  title=
5 Ayurvedic herbs For High Cholesterol ldl cholesterol level remedy in marathi

Ayurvedic Herbs For High Cholesterol : बदलेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे अनेक गंभीर आजार होतात. आज असंख्य लोक आरोग्याबद्दल जागृत झाले असून व्यायामावर भर देतात. पण नोकरीचा ताण आणि कामाच्या वेळा यामुळे आहारावर विशेष लक्ष देत नाहीत. त्यामुळे मधुमेहापासून उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या उद्भवते. गेल्या काही दिवसांमध्ये कोलेस्ट्रॉलची समस्या गंभीर होत चालली आहे. कोलेस्टेरॉलचे दोन प्रकार असून आपल्या शरीरात एचडीएल म्हणजे चांगल कोलेस्ट्रॉल आणि खराब कोलेस्ट्रॉरल म्हणजे एलडीएल असतं. खराब कोलेस्ट्रॉरलमुळे आपल्या शिरामध्ये चिकट पदार्थ घट्ट बसून असतो. त्यामुळे शरारीत रक्ताभिसरण कमी होतं आणि कधी कधी हा रक्तपुरवठा थांबला जातो. त्यामुळे त्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक यासारख्या आजारांचा सामना करावा लागतो. 

खराब कोलेस्टेरॉलला सामान्य भाषेत उच्च कोलेस्ट्रॉल असेही म्हटलं जातं. आयुर्वेदिक औषधी वनस्पतींच्या साहाय्याने उच्च कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यात येऊ शकतो, असं तज्ज्ञांचं मत आहे. आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत, असं दावा करण्यात येतो. कोणत्या आहेत कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठीच्या औषधी वनस्पती पाहूयात. 

अर्जुन साल

आयुर्वेदात अर्जुनाची साल अनेक रोगांवर रामबाण औषध मानली गेली आहे. ही अर्जुनाची साल वाईट कोलेस्ट्रॉरलसाठी फायदेशीर ठरते. अर्जुनाची सालमुळे खराब कोलेस्टेरॉलची निर्मिती रोखण्यापासून त्याची उच्च पातळी नियंत्रित ठरण्यास फायदा होतो असं म्हणतात. हे नसांमधील कोलेस्ट्रॉरल काढून नसा उघडण्यास मदत करते. अर्जुनाची साल रात्री झोपण्यापूर्वी दुधात मिसळून सेवन करावे असं सांगण्यात आलंय. 

पुनर्नवा

पुनर्नवा ही एक महत्त्वाची वनौषधी असून याच्या नियमित सेवनाने शिरांमध्ये साचलेली घाण वितळून बाहेर पडण्यास मदत मिळते. हे खराब कोलेस्ट्रॉल सहज नियंत्रित करते असं तज्ज्ञांचं मत आहे. तसंच हृदय निरोगी ठेवण्यासही ही वनस्पती मदत करतं. 

रोजमेरी

आयुर्वेदिक औषधी वनस्पतींमध्ये समाविष्ट असलेल्या रोजमेरीमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि दाहक-विरोधी गुणधर्म आढळतात. यामुळे जळजळ तर कमी होतेच पण नसांमध्ये जमा झालेले खराब कोलेस्टेरॉलही दूर होण्यास मदत मिळते. रोजमेरी चहा नियमितपणे प्यायल्याने हृदय निरोगी तर राहतच शिवाय कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यास फायदा होतो. 

त्रिफळा

आयुर्वेदिक औषध त्रिफळा सर्वात फायदेशीर मानली गेली आहे. त्यात अमलकी, विभिताकी आणि हरितकी यांचं समान मिश्रण असतं. या 3 गोष्टी एकत्र करून त्रिफळा निर्माण होतो. दररोज सुमारे 3 ग्रॅम त्रिफळा पाण्यासोबत घेतल्यास उच्च कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते. 

गुग्गुल

गुग्गुलू ही प्राचीन आयुर्वेदिक औषधी वनस्पतींपैकी एक असून रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासोबतच उच्च कोलेस्ट्रॉलसाठी फायदेशीर आहे. हे आयुर्वेदिक औषध असून शरीरातील ट्रायग्लिसराइड्स आणि खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी मदत मिळते. 

(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)