Normal Delivery Tips : आई होण्यासारखं दुसरं सुख या जगात नाही असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. एका मुलाला जन्म देणं हे स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण असतो. गरोदर असल्याचं कळल्यापासूनच या सुखाची सुरवात होते. मूळ गर्भात वाढत असतं, पण आई होणारी स्त्रीचं सुख आणि आनंद दुपट्टीने वाढत असतो. 9 महिने बाळाला पोटात सांभाळणं (pregnancy initial symptoms) आणि वाढवणं हे सर्वात मोठं आणि जोखमीचं काम असतं. सुरवातीला जो आनंद आहे तो हळूहळू वेदनेमध्ये बदलू लागतो, अनेक अवघडलेपणाला सामोरं जावं लागतं, जसजशी बाळाची गर्भात वाढ होते, त्याप्रमाणे धोकादेखील वाढत असतो. स्त्रीची परिस्थिती अधिक नाजूक होऊ लागते . (preganacy tips for working woman)
काही वेळा योग्य काळजी घेतली नाही तर सिझरियन करावं लागत, आणि ते फार धोक्याचं असत. तुम्हालासुद्धा नुकतेच दिवस गेले असतील, तुम्ही गरोदर असाल आणि तुम्हाला नॉर्मल डिलिव्हरी करायची असेल सिझरियन (how to avoid c section delivery) नको असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे .
नॉर्मल डिलिव्हरी करायची असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे , चला आज जाणून घेऊया त्याचविषयी.
गर्भधारणेदरम्यान तुम्ही एकदम फिट असाल निरोगी असाल तर बऱ्याच गोष्टी सहज होऊ शकतील. वजनही हेल्दी असेल तर कोणतीही समस्या जाणवणार नाही. हेल्दी प्रेग्नन्सी (healthy preganncy tips) साठी योग्य वजन राखण अत्यंत महत्वाचं असतं . म्हणूनच व्हिटॅमिन्स, आयर्न्स, सर्व पोषक तत्व शरीराला मिलन अतिशय महत्वाचं असत याकडे मुख्यतः लक्ष देणं खूप गरजेचं आहे. योग्य आणि निरोगी आहार गर्भधारणेदरम्यान करणं खूप गरजेचं आहे.
जेव्हा तुम्ही प्रेग्नन्ट असता , अनेक लोक येऊन तुम्हाला वेगवेगळे सल्ले देतात. पण एक लक्षात ठेवा प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे असतात. त्यांच्या अनुभवाप्रमाणे तुमची परिस्थिती असेलच असं नाही. त्यामुळे कुठलाही ताण तुम्हीबी घेऊ नका. ताण घेतल्याने शरीरावर आणि परिणामी होणाऱ्या बळावर त्याचा अतिशय वाईट परिणाम होतो. त्यामुळे गरोदरपणात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
बारुआचद गरोदरपणात हालचाल कमी करण्याचा सल्ला दिला जातो. पण काही स्त्रिया हालचल करायचं अगदीच बंद करतात. तसं करू नये योगा किंवा काही छोटे व्यायाम प्रकार आहेत ते केल्यास नॉर्मल डिलिव्हरी (normal delivery tips) होण्यास खूप मदत होते. हलका व्यायाम केल्याने तुमचं शरीर ऍक्टिव्ह राहत. त्यामुळे गरोदार्पणात एका जागी फार वेळ बसून राहू नका.
प्रत्येकाच्या आयुष्यात खास व्यक्ती असतो. तुमच्या आवडत्या आणि खास व्यक्तींना तुमच्या जवळ ठेवा. मग तुमची आई, बहीण, नवरा कोणीही असो. आवडत्या व्यक्तींच्या सहवासात आपसूकच सकारात्मक वाटू लागत. बाळंतपणाची तारीख जवळ आली की अनुभवी कोणीतरी जवळ असावं याची खात्री करा.
डिलिव्हरीचा शेवटचा आठवडा म्हणजे 41 व्या आठ्वड्यापर्यंत अनेकींना प्रसूतिवेदना होत नाहीत, त्यामुळे डॉक्टर कळा येण्याचं इंजेक्शन (labour pain injection) देतात किंवा काही औषधांद्वारे प्रसूती वेदना निर्माण केल्या जातात . शक्यतो निरोगी गर्भधारणेदरम्यान इंजेक्शन किंवा औषध टाळा. आणि नैसर्गिक प्रसूती कळा येण्याची वाट पाहा.
या काही टिप्स आहेत त्या तुम्ही नक्की पाळा , जेणेकरून नॉर्मल डिलिव्हरी व्हायला मदत होईल.