Sarangkheda Ghoda Bazaar : भारतातील सर्वात मोठा घोडे बाजार आपल्या महाराष्ट्रात भरतो. नंदुरबारमधील सारंगखेडा यात्रेला सुरुवात झाली. येथे भरणारा घोडेबाजार अर्थता चेतक फेस्टिवलची देशभरात चर्चा असते. या फेस्टिवलमध्ये आतापर्यंत 2 हजार 400 घोडे दाखल झालेत. तसंच आणखी घोडे येण्याची ही शक्यतायं. या घोडा बाजाराला अश्वप्रेमी ही भेट देतात. ही यात्रा विशेष करून मारवाडी प्रजातीच्या घोड्यांसाठी ओळखली जाते.
देशभरातील अश्वशौकिनांसाठी पर्वणी असलेला सारंगखेडाच्या चेतक फेस्टिवलला सुरुवात झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा यात्रेला सुरुवात झाली असून, यावर्षी चेतक फेस्टिवल मध्ये आश्वांचे अनेक स्पर्धा राबवल्या जाणार असून, चेतक फेस्टिवल मध्ये आतापर्यंत 2,400 घोडे दाखल झाले असून, आणखीन घोडे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे 3,500 पेक्षा अधिक घोडे दाखल होणार असल्याचे अंदाज आयोजकांकडून आला आहे.
या चेतक फेस्टिवल मध्ये 14 राज्यातून अश्व दाखल झाले आहेत. या सारंगखेडा यात्रेमध्ये पन्नास हजारापासून तर पाच कोटी पर्यंतचे घोडे विक्रीसाठी दाखल होत असतात या घोडा बाजारातून कोट्यवधी रुपयाची उलाढाल होत असते त्यामुळे अश्वप्रेमी एकदा तरी या सारंगखेडाच्या चेतक फेस्टिवल आणि अश्व बाजाराला भेट देत असतात.
नाशिकच्या येवल्यातील घोडे बाजाराला 350 वर्षाची परंपरा आहे. या घोडेबाजार करिता राज्यातून नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून असंख्य घोडे शौकीन सहभागी होतात. चेन्नई, कर्नाटक, पंजाब,काठेवाडी,गुजराथ,पंजाब,माथेरान अशा अनेक राज्यातून येवला शहरात घोडे विकले जातायत.
सांगलीच्या वाळवा येथे रिव्हर्स रिक्षाची स्पर्धा पाहायला मिळाला. श्री रेणुका माता यात्रेनिमित्ताने या रिव्हर्स रिक्षा स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं होतं. उलट्या दिशेने धावणाऱ्या रिक्षांचा थरार पाहण्यासाठी वाळव्यासह पंचक्रोशीतून ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.साखराळे रोडवर आयोजित करण्यात आलेल्या या रिव्हर्स रिक्षा स्पर्धेमध्ये जिल्ह्यातून 20 हुन अधिक रिक्षा चालकांनी सहभाग घेतला होता.कमीत कमी वेळामध्ये अंतर पार करण्याच्या या शर्यतीमध्ये रिक्षा चालकांचा थरारक कौशल्य पाहायला मिळाला. विजेत्या रिक्षाचालकांना यावेळी रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.