कितीही पौष्टिक तरी या पाच जणांसाठी फ्लॉवर ठरु शकतो घातक, आहारतज्ज्ञ काय सांगतात वाचा

Who Should Not Eat Cauliflower: फ्लॉवर कितीही पौष्टिक असला तरी अतिप्रमाणात त्याचे सेवन करणे आरोग्यासाठी नुकसानदायक ठरु शकते. आहार तज्ज्ञ काय सांगतात पाहा

मानसी क्षीरसागर | Updated: Dec 1, 2023, 05:41 PM IST
कितीही पौष्टिक तरी या पाच जणांसाठी फ्लॉवर ठरु शकतो घातक, आहारतज्ज्ञ काय सांगतात वाचा title=
health tips in marathi 5 side effects of cauliflower when eating too much

Who Should Not Eat Cauliflower: हिवाळ्यात फ्लॉवर खाण्याचा सल्ला दिला जातो. या दिवसात फ्लॉवर खाल्ले चांगले मानले जाते. हिवाळ्यात फ्लॉवरची भाजी, पराठे, भजी यासारखे पदार्थ केले जातात. चवीला तर फ्लॉवर छानच लागतो पण त्याचबरोबर आरोग्यासाठीही फायदेशीर असतो. फ्लॉवरमध्ये अनेक पोषक तत्वे असतात. व्हिटॅमिन सीबरोबरच फोलेट, व्हिटॅमिन बी 6, पॉटेशियम आणि मॅगनीजसारखे व्हिटॅमिन आणि मिनरलचा उत्तम स्त्रोत आहे. त्याचबरोबर यात फायबर, अँटीऑक्सीडेंट्स आणि अँटी इन्फेमेटरी गुणधर्म आढळले जातात. पण फ्लॉवर कितीही पौष्टिक असला तरी त्याचे नुकसानही असतात. आहार तज्ज्ञांच्या मते अतिप्रमाणात फ्लॉवर खाण्याचे तोटेही असतात. 

फ्लॉवर खाण्याचे फायदे

फ्लॉवर खाण्याचे नुकसान जाणून घेण्यापूर्वी आधी शरीराला त्याचे फायदे जाणून घेऊया. फ्लॉवरमध्ये इंडोल- 3 कार्बिनॉल आणि सल्फोराफेनसारखे गुणधर्म आढळतात. जे शरीरातील इन्फ्लेमेशन कमी करतात. फ्लॉवरमध्ये फायबर, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडेंट्स असतात. त्यामुळं कोलेस्ट्रॉल लेव्हल आणि बीपी नियंत्रणात राहतात. त्याचबरोबर फायबर असल्याने पचनसंस्था सुरळीत राहते आणि बद्धकोष्ठतापासून आराम मिळते. 

फ्लॉवर खाण्याचे नुकसान

आहार तज्ज्ञांच्या मते, अतिप्रमाणात फ्लॉवर खाल्ल्याने पोट फुगण्यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. तसंच, पाचनसंबंधी समस्याही निर्माण होऊ शकतात. खरं तर क्रूसिफेरस भाज्या पचायला जड जातात. विशेष म्हणजे कच्चा खाल्ल्यानंतर पोटात गॅसची समस्या व पाचनसंबंधी समस्या निर्माण होऊ शकते. 

पोटात सूज निर्माण होऊ शकते

क्रूसिफेरस भाज्यांमध्ये रैफिनोज असते. हे एक प्रकारचे कार्बोहायड्रेट आहे. शरीरात त्याचे विघटन करण्यासाठी एंझाइम पुरेशा प्रमाणात नसते. जेव्हा तुम्ही कार्बोहायड्रेट असलेल्या भाजीचे सेवन करता तेव्हा त्याचे पचन न होताच आतडीपर्यंत पोहोचते. तिथे असलेल्या बॅक्टेरियामुळं ते आंबायला लागतात. त्यामुळं पोटात जळजळ निर्माण होते. 

फ्लॉवरमध्ये ग्लूकोसाइनोलेट्स नावाचे सल्फरयुक्त रसायन असते. जेव्हा हे रसायन पोटात जातात तेव्हा ते हायड्रोजन सल्फाइडसारखे संयुगे तयार करतात आणि त्यामुळं पोटात गॅस तयार होतो. त्यामुळं ही भाजी खाल्ल्यानंतर पोट जड जड वाटू लागते. 

थायरॉइडची समस्या

फ्लॉवरसारख्या भाज्या ग्रंथीच्या कार्यात व्यत्यय आणू शकतात. हायपोथायरॉईडीझम किंवा तत्सम परिस्थितींनी ग्रस्त असलेल्यांना या भाजीचे सेवन न करण्याचा सल्ला दिला जातो.

अॅलर्जीचा धोका

काही जणांना फ्लॉवरची भाजी खाल्ल्याने अॅलर्जी होण्याची शक्यता असते. अशावेळी त्वचेवर खाज, पुरळ, श्वास घेण्यास त्रास, सूजसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)