Remove Bra While Sleeping : अनेकदा आपण पाहतो की, काही महिला रात्री झोपताना ब्रा घालूनच झोपतात. मात्र सामान्यपणे प्रत्येक महिलेने रात्री ब्रा काढून झोपण्याचा सल्ला दिला जातो. दिवसा किंवा बाहेर जाताना ब्रा घालणे शरीरासाठी आवश्यक असते. यामुळे स्तन आकर्षक आणि सुढौल दिसतात. मात्र प्रत्येक वेळी ब्रा घालणे हा काही चांगला विचार नाही.
रात्री झोपताना कायमच आरामदायी कपडे आणि ब्रा न घालता झोपणे शरीरासाठी फायदेशीर ठरू शकते. घट्ट किंवा इलास्टिक असलेले कपडे घालणे टाळले पाहिजेत. ज्यामुळे फक्त तुमची झोपच नाही तर स्वास्थ देखील निरोगी राहते. अनेकांचा असा समज आहे की, ब्रा न घातल्यामुळे स्तनांना स्थुलपणा येतो. त्याचा शेप बिघडतो. मात्र वास्तवात असं अजिबात नाही. मात्र Healthline ने दिलेल्या रिपोर्टनुसार, ब्रा घालणे गरजेचे नाही. ब्रा न घातल्यास स्तनांवर काहीच परिणाम पडत नाही. याला इतर कारणे जबाबदार आहेत.
जर तुम्ही झोपताना ब्रा घातली असेल तर श्वास घेताना त्रास जाणवतो. तसेच ब्रामध्ये पॅडेड, वायर्ड ब्रा असेल तर त्याचा देखील त्रास होतो. छाती जास्त घट्ट वाटू लागते आणि यामुळे छाती दुखण्याचा त्रास जाणवतो. अशावेळी ब्रा न घालता झोपण्याचा विचार करावा.
जर ब्रा काढून झोपलात तर झोप चांगली लागते, असा अनेक महिलांचा अनुभव आहे. शरीर दिवसभर थकलेले असते अशावेळी शरीराला थोडा आराम मिळावा या अनुशंगाने ब्रा घालू नये. क्रोनोबायोलॉजी इंटरनॅशन जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या रिसर्चमध्ये ब्रा किंवा पँटी सारखे अंतवर्स्त्र न घालून झोपणे फायदेशीर आहे.
जर तुम्ही सतत ब्रा घालत अलात तर स्तनांना आणि निप्पलला मोकळी हवा मिळत नाही. त्यामुळे तिकडची त्वचा रूक्ष, कोरडी होती. हा भाग अतिशय संवेदनशील असतो त्यामुळे काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते.
महिलांना ब्रेस्ट कॅन्सरचा धोका अधिक असतो. याचे मुख्य कारण सतत ब्रा घालणे आणि टाईट ब्राचा वापर करणे. त्यामुळे महिलांनी स्वतःची काळजी घ्यावी.
खूप टाईट किंवा वायर ब्रा घातल्याने स्तनांमध्ये सिस्ट तयार होण्याची दाट शक्यता असते. यामुळे रात्री ब्रा न घालून झोपणे हाच यावर योग्य उपाय आहे.
घट्ट ब्रामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगले होत नाही. वायर ब्रा किंवा पॅडेड ब्राची समस्या जाणवते. अशावेळी निरोगी आरोग्यासाठी ब्रा न घालणे हा फायदेशीर आहे. रात्री झोपताना ब्रा न घालणे हा एकच यावर पर्याय आहे.