महाराष्ट्रात कोरोनाच्या 'इतक्या' नव्या रुग्णांची नोंद, 6 जणांचा मृत्यू

गुरुवारपेक्षा शुक्रवारी महाराष्ट्रात जास्त रुग्ण आढळले आहेत.

Updated: Jul 23, 2022, 06:16 AM IST
महाराष्ट्रात कोरोनाच्या 'इतक्या' नव्या रुग्णांची नोंद, 6 जणांचा मृत्यू title=

मुंबई : शुक्रवारी महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या संसर्गाचे 2,515 नवीन रुग्ण आढळून आले. यामुळे एकूण बाधितांची संख्या 80,29,910 झाली आहे, तर आणखी 6 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 1,48,051 वर पोहोचला आहे. गुरुवारपेक्षा शुक्रवारी महाराष्ट्रात जास्त रुग्ण आढळले आहेत. गुरुवारी, 2,289 लोकांना संसर्ग झाल्याची नोंद झाली. 

महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, गेल्या 24 तासांत 2,449 लोक संसर्गातून बरे झाल्यानंतर, बरे झालेल्या लोकांची एकूण संख्या 78,67,280 झाली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 14,579 वर आली आहे.

दरम्यान, यामध्ये शुक्रवारी मुंबईत संसर्गाचे 299 रुग्ण आढळून आले असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. शहरात संक्रमित आढळलेल्या लोकांची संख्या 11,22,408 झाली आहे, तर 16,637 लोकांचा मृत्यू झाला आहे. महानगरपालिकेच्या एका अधिकाऱ्याकडून ही माहिती देण्यात आली आहे. 

बृहन्मुंबई पालिकेच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सलग सात दिवस संसर्गाची 300 पेक्षा कमी प्रकरणांची नोंद झाली आहे. ते म्हणाले की, आणखी 364 लोक संसर्गातून बरे झाले आहेत. बरे झालेल्या लोकांची संख्या 11,00,900 झाली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 1,871 आहे.