जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर या ६ गोष्टी करा

यशस्वी माणसाची लक्षणे...

Updated: Oct 20, 2018, 09:34 AM IST
जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर या ६ गोष्टी करा title=

मुंबई : तुम्हाला जर तुमच्या जीवनात काही तरी मिळवायचं असेल आणि यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला खाली दिलेल्या 6 गोष्टी केल्या पाहिजेत. प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या जीवनात या 6 गोष्टी दिसतात. ज्यामुळे ते आज यशस्वी झाले आहेत. जाणून घ्या त्या 6 गोष्टी कोणत्या आहेत.

1. रिकाम्या वेळेचा सदुपयोग

तुम्ही कामावरुन घरी गेल्यानंतर काय करता ? टीव्ही पाहता, सोशल मीडियावर मित्रांसोबत चॅट करता किंवा मग पार्टी करण्यासाठी जाता. पण तुम्हाला मिळालेल्या रिकाम्या वेळेचा वापर जर तुम्ही योग्य पद्धतीने केला तर  तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही.  स्टीव जॉब, इमा वॉट्सन, इलॉन मस्क आणि टीम कूक यांनी रिकाम्या वेळेचा सदुपयोग करुन यश गाठलं.

2. पुरेशी झोप घ्या.

अपुरी झोप फक्त तुम्हाला अस्वस्थच करत नाही तर तुमचा दुसरा दिवस देखील खराब करते. याचा परिणाम तुमच्या कामावर नक्कीच होतो. अॅपल कंपनीचे सीईओ रोज रात्री ९.३० ला झोपायचे आणि ७ तासांची झोप घ्यायचे. फेसबूकचे सीओओ सँडबर्ग  झोप खराब होऊ नये म्हणून रात्री मोबाईल बंद करुन ठेवायचे. रोज ७ तासांची पुरशी झोप घेतलीच पाहिजे.

3. वाचन, वाचन आणि वाचन

काहीही वाचा पण वाचलं पाहिजे. वाचणामध्ये वेळ गुंतवल्याने त्याचे परिणाम देखील चांगले येतात. यामुळे तुमचं ज्ञान, कौशल्य आणि तुमचं संभाषण कौशल्य देखील चांगलं होतं. वाचणाने तुमच्या शब्द भंडारात देखील वाढ होते. इलॉन मस्क, वॉरेन बफेट, बिल गेट्स आणि इतर यशस्वी लोकांमध्ये वाचण ही कॉमन गोष्ट आहे.

4. व्यायाम करा

व्यायाम केल्याने माणूस लवकर अतिवृद्ध होऊ शकत नाही. ६८ वर्षीय व्हर्जिन ग्रुपचे संस्थापक रिचर्ड ब्रान्सन यांनी सांगितले की, व्यायामामुळे त्यांना "दुप्पट यश मिळालं. शिवाय, इतर अनेक फायदे देखील झाले. आत्मविश्वास पातळी, सर्जनशीलता, एकाग्रता पातळी, मेमरी आणि उत्साह वाढला.

5. नाही म्हणतांना घाबरु नका

नाही म्हणणं हे देखील एक कौशल्य आहे. नाही म्हणण्याची कला प्रत्येकामध्ये नसते. जेव्हा तुम्ही अनप्रोडक्टीव्ह काम, मिटींग आणि असाईमेंट्सला नाही म्हणता तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थाने प्रोडक्टीव्ह कामाला सुरुवात करता. योग्य कामाला प्रधान्य द्या. ज्यामुळे तुम्ही कामावर फोकस करु शकता आणि तुमचा परफॉर्मन्स आणखी चांगला होऊ शकतो. स्टीव्ह जॉब म्हणतात की, फोकस म्हणजे हो म्हणणं पण अशा कामांना ज्यामुळे तुमचा फोकस आणखी वाढेल.  पण याचा अर्थ असं नाही की १०० चांगल्या गोष्टींना देखील नाही म्हणायचं.

6. शिका आणि अभ्यास करा

नवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि अभ्यास करण्यासाठी वयाचं बंधन नसतं. आपण स्वत: ला कसे विकसित कराल आणि कशा प्रकारे तुम्ही प्रतिस्पर्धकांच्या बरोबरीने पुढे जाल याचा विचार केला पाहिजे. यासाठी लेखन कार्यशाळा, मनोचिकित्सा किंवा नवीन विषयांचा अभ्यास करणं फायद्याचं ठरु शकतं. ईमा वॉटसनने आपल्या अभिनय करियरमधून ब्रेक घेतला आणि ब्राउन युनिव्हर्सिटीमध्ये अभ्यास करण्यासाठी प्रवेश घेतला.