मुंबई : हल्ली बाजारात शेविंग करण्याकरता अनेक क्रिम आहेत. पण त्याचा वाप न करता घरगुती पदार्थाचा वापर करून तुम्ही शेविंग करू शकता. यासाठी वापरा या घरगुती गोष्टी....
या पदार्थाने चेहऱ्यावरील जळजळ देखील कमी होते. आणि त्वचा तजेलदार राहते.
१) कच्चे दूध चेहऱ्यावर लावल्याने स्किन आणि केस सॉफ्ट होतात आणि शेव चांगल्या प्रकारे करता येते
२) मध कोमट पाण्यात टाकून त्या मिश्रणाने चेहऱ्याचा मसाज करा. केस सॉफ्ट होतील आणि शेविंग चांगली होईल
३) शेविंग करण्याअगोदर खोबरेल तेलाने त्वचेची हलकी मसाज करा. यामुळे रेजर बर्न आणि ड्रायनेसपासून सुटका मिळते.
४) बटर हे एक उत्तर मॉश्चरायजर आहे. यामुळे कडक केस सॉफ्ट होतात आणि लवकर काढता येतात.
५) शेविंग क्रीम नसेल तर त्वचेवर केळीची पेस्ट लावून मसाज करा. यानंतर शेविंग केली तर सहज शेव होईल.
६) पपईमधील पापेन नामक एंजाइम त्वचेचे रॅशेज आणि जळजळ दूर करते. चेहऱ्यावर मसाज करून नंतर शेव करा
७) अॅलोवेरा जेल हे आरामदायक गारवा देते. याने त्वचेवर हलकी मसाज करा आणि नंतर शेविंग करा. जळजळपासून आराम मिळतो.
८) बदाम तेल शेविंग करण्याअगोदर लावल्याने जळजळ होणार नाही. इटिरेशन होत नाही. स्किन सॉफ्ट होते.