Fitness Tips : बसून दूध पित असाल तर आजच बदला ही सवय, कारण...

जाणून घेऊया आयुर्वेदात दूध पिण्यासंदर्भात कोणते नियम सांगितले आहेत.

Updated: Jun 12, 2021, 06:42 PM IST
Fitness Tips : बसून दूध पित असाल तर आजच बदला ही सवय, कारण... title=

मुंबई : मोठ्या तसंच वयस्कर व्यक्ती नेहमी म्हणतात की, बसून पाणी प्यावं आणि दूध पिताना उभं रहावं. मात्र अनेकदा आपण त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो. परंतु खऱ्या अर्थाने या गोष्टी म्हत्त्वपूर्ण असून त्यामध्ये आरोग्याचे फायदेही लपले आहेत. त्यामुळे जर तुम्हाला अजूनही बसून दूध पिण्याची सवय आहे तर आजचं ती बदला. जेणेकरून तुम्हाला त्याचे पू्र्ण फायदे मिळतील. जाणून घेऊया आयुर्वेदात दूध पिण्यासंदर्भात कोणते नियम सांगितले आहेत.

1. आयुर्वेदात असं म्हटलं आहे की, बसून दूध प्यायल्यामुळे पाचन समस्या उद्भवतात आणि पचनासंबंधी समस्यांमुळे संपूर्ण शरीरावर त्याचा परिणाम होतो. तर उभं राहून दूध प्यायल्याने शरीराला संपूर्णपणे लाभ मिळण्यास होतो तसंच त्रिदोष म्हणजे वात, पित्त आणि कफ संतुलित राहतात.

2. उभं असताना दूध पिण्याचे इतरही बरेच फायदे आहेत. यामुळे गुडघे खराब होत नाहीत आणि स्नायू मजबूत होतात. याशिवाय हृदयरोग आणि हाय बीपीसारख्या समस्या रोखल्या जातात. तसंच डोळे आणि त्वचेसाठीही फायदेशीर मानलं जातं.

3. रात्री झोपण्यापूर्वी अर्धा तास आधी नेहमी कोमट दूध प्यावं. यावेळी त्यामध्ये साखरेचा वापर करू नये. हवं असल्यास यामध्ये थोडासं गूळ वापरू शकता. दुधामध्ये एक चमचा गाईचं तूप मिसळलं तर ते अधिक फायदेशीर ठरतं.

4. आयुर्वेद देखील मानतं की, दूध नेहमीच उकळून प्यावं. जर आपल्याला ते जड वाटत असेल तर आपण थोडेसे पाणी घालून ते पिऊ शकता. यामुळे ते हलकं आणि पचण्याजोगं होईल.

5. दुधाचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी, रात्रीच्या जेवणानंतर दोन तास आणि झोपेच्या अर्धा तास आधी प्यावं. रात्रीचे जेवण रात्री साडेसात वाजेपर्यंत करावं.

6. दूध कधीच जेवणासोबत पिऊ नये कारण ते सहज पचत नाही.