.. another word for Living; पन्नाशीतील ऐश्वर्या नारकर Anti Aging साठी करते 'या' गोष्टी

Aishwarya Narkar Anti Aging : अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांचं अगदी विशीतील तरुणीला लाजवेल असं सौंदर्य आहे. पन्नाशीतही तरुण दिसण्यासाठी अभिनेत्री करतात या खास गोष्टी... 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Mar 8, 2024, 07:27 PM IST
.. another word for Living; पन्नाशीतील ऐश्वर्या नारकर Anti Aging साठी करते 'या' गोष्टी title=

Anti Aging Health Tips : अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी आपल्या अभिनयासोबतच सौंदर्याने सगळ्यांना भुरळ घातली आहे. सोशल मीडियावर ऐश्वर्या नारकर खूप सक्रिय असतात. वयाच्या पन्नाशीमध्ये ऐश्वर्या नारकर यांचा फिटनेस प्रत्येकालाच लाजवेल असा आहे. ऐश्वर्या नारकर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केलाय. यामध्ये त्यांनी पन्नाशीतील महिला आणि त्यांचे प्रॉब्लेम्स शेअर केले आहेत. ज्यामध्ये पांढरे केस, अनुहटीवर येणारे केस, गालावरील लोमकळती त्वचा, सुरकुत्या याबाबत त्यांनी सांगितलं आहे. पण पुढे ऐश्वर्या म्हणतात की, पण याचा विचार कोण करतंय? कारण Aging is just another word for living .... 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Aishwarya Narkar (@aishwarya.narkar)

Aging ची समस्या 

वृद्धत्व ही नैसर्गिक प्रक्रिया असली तरी ती थांबवणे सोपे नाही. तरी देखील हे खरे आहे की, काही सवयी तुम्हाला अकाली वृद्ध बनवू शकतात. त्याचबरोबर काही सवयी तुम्हाला तुमच्या वयापेक्षा तरुण दिसण्यास मदत करू शकतात. 

एजिंग कसं रोखावं?

योग्य आहार घेणे, पुरेशी झोप घेणे, आहारातील आरोग्यदायी गोष्टींचा समावेश करणे, तणावापासून दूर राहणे आणि अशा अनेक गोष्टी आहेत ज्या वृद्धत्वावर परिणाम करतात. काही महिलांकडे पाहून त्यांच्या वयाचा अंदाज लावणे कठीण होऊन बसते हे तुम्ही अनेकदा लक्षात घेतले असेल. हे त्यांच्या योग्य आहार आणि सवयींमुळे घडते. अभिनेत्री ऐश्वर्या नारकर याचं उत्तम उदाहरण आहे. 

एक चमचा तूप खाणे

तूप खाल्ल्याने वजन वाढते, असा समज आजकाल लोक आहारातून काढून टाकू लागले आहेत. तथापि, तूप हेल्दी फॅट्सने समृद्ध आहे आणि ते खाल्ल्याने अनेक फायदे होतात. तुपात मॉइश्चरायझिंग गुणधर्म आढळतात. हे एक नैसर्गिक क्लिंजर आहे आणि शरीराला आतून डिटॉक्सिफाय करते. महिलांनी रोज 1 चमचा तूप खावे. हे बारीक रेषा आणि सुरकुत्या कमी करण्यात मदत करू शकते.

चिया आणि फ्लॅक्स सीड्स खा

चिया आणि फ्लॅक्स सीड्समध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असते. हे दोन्ही बिया आतड्याच्या आरोग्यासाठी खूप चांगले आहेत. आतड्याच्या आरोग्याचा थेट परिणाम आपल्या शरीरावर आणि त्वचेवर होतो. त्यामुळे या दोन्ही बिया भिजवून त्यांचा आहारात समावेश करणे फायदेशीर ठरू शकते.

निरोगी राहण्यासाठी चालणे

दररोज सकाळी चालण्याचे असंख्य फायदे आहेत. निरोगी राहण्यासाठी दररोज सकाळी चालणे आवश्यक मानले जाते. चालण्याने प्रतिकारशक्ती वाढते आणि वजन कमी होते. त्याचे इतरही अनेक फायदे आहेत. सकाळी 10-15 मिनिटे सूर्यप्रकाशात चालणे देखील शरीरातील व्हिटॅमिन डीची पातळी सुधारते आणि त्वचेच्या आरोग्यासाठी देखील चांगले असते.

बदामाच्या तेलाने मसाज करा

बदामाचे तेल त्वचेच्या आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते. त्यात व्हिटॅमिन ई आणि के असते. यामुळे त्वचेतील रक्ताभिसरण वाढते. बदामाच्या तेलाने त्वचेला मसाज केल्याने त्वचा घट्ट होते आणि वाढत्या वयानुसार ती सैल होण्यापासून वाचते.