शरीरात कॅल्शियमची कमतरता असल्यास 'या' आजारांचा धोका, आत्ताच बदला डायट

Calcium Rich Foods: कॅल्शियम हे आपल्या शरीरासाठी एक आवश्यक पोषक तत्व आहे जे आपली हाडे, दात आणि स्नायू मजबूत करण्यासाठी प्रभावी आहे. शरीरात कॅल्शियमची कमतरता असल्यास अनेक आजारांचा सामना करावा लागतो. 

मानसी क्षीरसागर | Updated: Aug 31, 2023, 01:47 PM IST
शरीरात कॅल्शियमची कमतरता असल्यास 'या' आजारांचा धोका, आत्ताच बदला डायट title=
add these top 10 calcium rich foods in your diet to make your bones healthy

Calcium Rich Foods: शरीरात कॅल्शियमची मात्रा कमी असल्यास हाडे, दात, हृदयासह न्यूरोमस्कुलर या सारख्या अवयवांवर परिणाम होतो. कॅल्शियमच्या कमतरतेमुळं हाडे कमजोर होतात त्यामुळं ऑस्टियोपोरोसिसचा धोकाही वाढू शकतो. इतकंच नव्हे तर दातांच्या मजबूतीसाठीही कॅल्शियम महत्त्वाचे आहे. 

कॅल्शियमच्या कमतरतेमुळं न्यूरोमस्कुल डिस्फक्शन होऊ शकते. ज्यामुळं मांसपेशीत कमजोरी आणि मांसपेशींमध्ये तणाव जाणवू शकतो. यामुळं हृदयरोगांचा धोकाही वाढू शकतो. कॅल्शियम कमी असल्यास रोगप्रतिकार शक्ती कमजोर होते. त्यामुळं अनेक आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो. त्याचबरोबर हार्मोनल डिसीजही वाढू शकतात. त्यामुळं शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण झाली असेल तर वेळीच खबरदारी घेण्याची गरज आहे. शरीरातीम कॅल्शियमची कमतरता भरुन काढण्यासाठी कोणत्या गोष्टींचे सेवन केले पाहिजे हे जाणून घेऊया. 

दूध आणि दूधापासून बनवलेले उत्पादन 

दूध आणि दूधापासून बनवलेले उत्पादन जसे दही, पनीर,चीज, लस्सी यामध्ये कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत असतो. या पदार्थाचा आहारात समावेश केल्याने हाडांना बळकटी येते. 

तीळ 

तीळामध्येही कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत असतो. जर कच्चे तीळ खाणे जमत नसेल तर सलाड, ब्रेड किंवा चपाती पराठे यात टाकून तुम्ही तीळ खावू शकता. किंवा तिळाची चिक्कीदेखील खाऊ शकता. 

हिरव्या पालेभाज्या

हिरव्या पालेभाज्या जसं की पालक, मेथी, शेपू यात कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत असतो. त्याव्यतिरिक्त यात आयरन आणि फायबरची मात्रादेखील अधिक असते. ज्यामुळं शरीरात रक्तप्रवाह सुरळीत ठेवतो व रक्ताची कमतरतादेखील भरुन काढतो. 

ब्रोकोली

ब्रोकोलीला जगातील सर्वात ताकदवार भाजी मानतात. यात कॅल्शियमची मात्रा चांगली असते. त्याचबरोबर यात अँटीऑक्सिडेंट्सचा स्त्रोतही चांगला असतो. 

बदाम

बदामात प्रोटीन आणि हेल्दी फॅटसोबतच कॅल्शियम सापडले जाते. बदामाचे सेवन केल्यास हृदय आणि बुद्धी निरोगी राहते. हाडांच्या बळकटीसाठी रोज भिजवलेले बदाम खाणे फायदेशीर ठरते. त्याबरोबर बिन्स, संत्रे, पनीर, टोफू आणि सॅल्मेन फिशमध्येही कॅल्शियम आढळले जाते. 

खजूर

खजूरातही कॅल्शियमची चांगला स्त्रोत असतो. त्याचबरोबर व्हिटमिन आणि मिनरल्सदेखील मुबलक प्रमाणात आढळतात. जर तुम्हाला नेहमीच थकवा आणि आळस जाणवत असेल तर रोज कमीत कमी तीन खजूर खाल्ले पाहिजेत. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)