वजन कमी करण्यासाठी दररोज प्या ब्लॅक टी

तुम्हाला ब्लॅक टी प्यायला आवडते का? तुम्हाला त्याची सवय झालीये का? या प्रश्नांचे उत्तर हो असेल तर घाबरु नका. नव्या संशोधनानुसार, वजन कमी करण्यासाठी ब्लॅक टीचा फायदा होऊ शकतो.

Updated: Oct 5, 2017, 09:11 PM IST
वजन कमी करण्यासाठी दररोज प्या ब्लॅक टी title=

मुंबई : तुम्हाला ब्लॅक टी प्यायला आवडते का? तुम्हाला त्याची सवय झालीये का? या प्रश्नांचे उत्तर हो असेल तर घाबरु नका. नव्या संशोधनानुसार, वजन कमी करण्यासाठी ब्लॅक टीचा फायदा होऊ शकतो.

रिसर्चनुसार, ब्लॅक टीमध्ये पॉलिफेनोल नावाचा पदार्थ असतो जो वजन कमी करण्यास मदत करतो. 

रिसर्चर हॅनिंगच्या माहितीनुसार ग्रीन आणि ब्लॅक टीमध्ये प्रोबायोटिक्स असतात ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

रिसर्चदरम्यान उंदरावर हा प्रयोग करण्यात आला. यासाठी उंदराचे दोन ग्रुप तयार करण्यात आले होते. पहिल्या ग्रुपमधील उंदराचे वजन अधिक होते आणि शुगरचे प्रमाण अधिक होते. दुसऱ्या ग्रुपला ब्लॅक आणि ग्रीन टी पाजण्यात आली. उंदरावरील प्रयोगामध्ये काळ्या चहामुळे आतड्यांमधील जीवाणूंचे गुणोत्तर वाढल्याचे आढळले.