केदारनाथ धामवरुन आल्यानंतर शमिता शेट्टी हॉस्पिटलमध्ये, 'या' गंभीर आजाराने ग्रस्त, ऑपरेशनपूर्वीचा VIDEO शेअर करत म्हणाली...

काही दिवसांपूर्वी शिल्पा शेट्टी, शमिता शेट्टी आणि त्यांची आई यांनी केदारनाथ आणि वैष्णदेवीचं दर्शन घेतलं. त्यानंतर शमिता हॉस्पिटमध्ये दाखल करण्यात आलेल्याचा एक व्हिडीओ बहीण शिल्पाने सोशल मीडियावर पोस्ट केला. 

Updated: May 15, 2024, 11:21 AM IST
केदारनाथ धामवरुन आल्यानंतर शमिता शेट्टी हॉस्पिटलमध्ये, 'या' गंभीर आजाराने ग्रस्त, ऑपरेशनपूर्वीचा VIDEO शेअर करत म्हणाली... title=
After coming from Kedarnath Dham in Shamita Shetty Hospital suffering from serious disease endometriosis shared the pre operation video

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या आई आणि बहीणसोबत केदारनाथ धाम आणि वैष्णदेवीच्या दर्शनाला गेले होते. या क्षणाचे फोटो आणि व्हिडीओ शिल्पा आणि तिची बहीण शमिता हिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पण त्यानंतर रविवारी मुंबईत परतल्यानंतर मंगळवारी शिल्पा शेट्टीने शमिताचा एक व्हिडीओ शेअर केला. ज्यामध्ये ती हॉस्पिटमध्ये दाखल असल्याच दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shamita Shetty (@shamitashetty_official)

शमिता 'या' गंभीर आजाराने ग्रस्त!

शमिता गेल्या काही महिन्यांपासून खूप आजारी असल्याचं अभिनेत्रीने आपल्या सोशल मीडिया हँडलवर सांगितलंय. शमिताला एंडोमेट्रिओसिस आजार झाला असून मुंबईतील रुग्णालयात तिच्या शस्त्रक्रिया करण्यात आली. शमिताने हॉस्पिटलमधल्या एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यावर तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, तुम्हाला माहित आहे की सुमारे 40% महिला एंडोमेट्रिओसिसने ग्रस्त आहेत. आपल्यापैकी बहुतेकांना या आजाराबद्दल माहिती नाही. मी माझ्या डॉक्टर, डॉ. नीता वर्टी आणि माझ्या GP, डॉ. सुनीता बॅनर्जी या दोघांचेही आभार मानते.  कारण माझ्या वेदनांचे मूळ कारण सापडेपर्यंत ते थांबले नाहीत. आता माझा आजार थेरपी आणि शस्त्रक्रियेद्वारे संपुष्टात आला आहे. चांगल आरोग्य आणि अधिक शारीरिक वेदनामुक्त दिवसांची वाट पाहत आहे!'

हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर चाहत्यांनी तिला लवकर बरं वाटाव म्हणून प्रार्थना केली आहे. एका यूजरने लिहिलंय, काळजी घ्या, लवकर बरे व्हा. दुसऱ्याने कंमेट केलंय की, तुम्हाला चांगले आरोग्य आणि लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा. 

एंडोमेट्रिओसिस म्हणजे काय?

एंडोमेट्रिओसिस ही एक तीव्र आणि वेदनादायक आजार आहे. जी जगभरातील लाखो स्त्रियांना या आजाराने ग्रासलंय. या आजारात गर्भाशयाच्या अस्तर (एंडोमेट्रियम) सारखी ऊतक गर्भाशयाच्या बाहेर वाढायला लागते. एंडोमेट्रियल इम्प्लांट अंडाशय, फॅलोपियन ट्यूब आणि ओटीपोटाचे अस्तरमध्ये वाढते. क्विचत प्रसंगी ती शरीरात पसरते. 

एंडोमेट्रिओसिस आजाराची लक्षणं!

ओटीपोटात वेदना, वेदनादायक मासिक पाळी, क्रॉनिक पेल्विक पेन, वेदनादायक संभोग, मासिक पाळीत जड रक्तस्त्राव, वेदनादायक आतड्याची हालचाल किंवा लघवी. एंडोमेट्रिओसिस हे महिला वंध्यत्वाचं प्रमुख कारणं आहे. 

(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)