मुंबईकरांनो सावधान! डेंग्यू डोकं वर काढतोय

दुसरीकडे मुंबईत डेंग्यूचा धोका वाढला आहे. 

Updated: Sep 15, 2021, 02:37 PM IST
मुंबईकरांनो सावधान! डेंग्यू डोकं वर काढतोय title=

मुंबई : देशात आलेल्या दुसऱ्या लाटेचा फटका अनेकांना बसला. सध्या दुसरी लाट ओसरताना दिसून संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवण्यात आला आहे. अशातच दुसरीकडे मुंबईत डेंग्यूचा धोका वाढला आहे. 

यंदाच्या वर्षी आतापर्यंत  मुंबईत जानेवारी 2021 पासून आतापर्यंत डेंग्यूचे 305 रुग्ण आढळून आले आहे. त्यात 85 रुग्ण या महिन्यातील आहेत. याबाबत मुंबई महानगरपालिकेने अहवाल सादर केला आहे.

मुंबई महापालिकेने दिलेल्या अहवालानुसार, मुंबईमध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये दुपट्टीने वाढ झाली आहे. गेल्यावर्षी मुंबईत डेंग्यूचे 129 रुग्ण आढळलं होतं. या अहवालात म्हटलं आहे की, आतापर्यंत मच्छरामुंळे होणाऱ्या आजारामुळे एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. तर 2020 मध्ये तीन जणांचा मृत्यू झाला होता. 

अहवालात नमूद केल्याप्रमाणे, मुंबईत सप्टेंबरमध्ये डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण समोर आले आहेत. 1 ते 12 सप्टेंबरदरम्यान डेंग्यूचे 85 रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या महिन्यात ही संख्या 144 पर्यंत पोहोचली होती. भायखळा, चिंचपोकली, आग्रीपाडा, दादर-पूर्व, सायन-पूर्व, माटुंगा, अन्टॉप हिल, धारावी, दादर आणि माहिममध्ये डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत.

डेंग्यू तापाची सामान्य लक्षणं

डेंग्यू ताप हा डास चावल्यामुळे होतो आणि असे मानले जाते की डेंग्यू डास दिवसा चावतो. या तापाची लक्षणे एक ते दोन दिवसात दिसू लागतात. जेव्हा डेंग्यू ताप येतो तेव्हा प्रथम डोळे लाल होऊ लागतात आणि नंतर शरीरात रक्ताचा अभाव असतो. अशा स्थितीत शरीरात अशक्तपणा आणि चक्करही येऊ शकते. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, डेंग्यू तापामध्ये, रुग्ण शरीराच्या वेदनांची तक्रार करतो, तर व्हायरल ताप सहसा सर्दीसह येतो.