मुंबई : कोरोनाच्या ओमायक्रोन व्हेरिएंटने संपूर्ण जगभरात धुमाकूळ घातला आहे. अशी परिस्थिती गंभीर असताना कोरोनाचा सुपर व्हेरिएंटही येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. सुपर व्हेरिएंट येत असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिलाय.
मॉडर्नाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पॉल बर्टन यांनी ओमायक्रोन व्हेरिएंट आणि डेल्टा व्हेरिएंट एकत्र मिळून एखाद्याला संक्रमित केलं तर कोरोनाचा नवा सुपर व्हेरिएंट तयार होऊ शकतो. सामान्यतः लोकांना कोरोनाच्या फक्त एका म्युटेंट स्ट्रेनचा संसर्ग होतो. काही विशेष प्रकरणांमध्ये एकाच वेळी दोन स्ट्रेन रुग्णाला संक्रमित करतात.
जर डेल्टा आणि ओमायक्रोन या दोन्ही व्हेरिएंटने एकालाच संक्रमित केलं तर ते एकमेकांशी डीएनएची देवाणघेवाण करू शकतात. आणि जर हे दोघं एकत्र आले तर कोरोनाचा नवा सुपर स्ट्रेन तयार होऊ कोरोनाचा धोका अधिक वाढू शकतो, असं मत बर्टन यांनी व्यक्त केलं आहे. न्यू साऊथ वेल्स विद्यापीठातील विषाणूशास्त्रज्ञ पीटर व्हाईट यांनीदेखील या महिन्यात एक सुपर स्ट्रेन उद्भवण्याचा इशारा दिला आहे.
कोरोना विषाणूचा एक नवीन प्रकार असलेल्या ओमायक्रॉनचा धोका जगभरात पसरत आहे. दरम्यान, नॅशनल कोविड सुपरमॉडेल पॅनलने अंदाज व्यक्त केला आहे की, पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव शिखरावर असेल. ओमायक्रॉनमुळे भारतात कोरोनाची तिसरी लाट येणार आहे.
भारतात दररोज सुमारे 7 ते साडेसात हजार कोरोना व्हायरसचे रुग्ण येत आहेत. ही प्रकरणे डेल्टा प्रकारातील आहेत. पण लवकरच ओमायक्रॉन डेल्टा व्हेरियंटची जागा घेईल.