इंग्लंड: इंग्लंडच्या एका महिलेसोबत असा काही धक्कादायक प्रकार घडला आहे की अनेकांना या गोष्टीचं आश्चर्य वाटेल. ब्रिटनमधील ही महिला गर्भवती राहिली आहे मात्र शारीरिक संबंधांशिवाय...सामंथा गिब्सन असं या महिलेचं नाव आहे. सामंथात्या म्हणण्याप्रमाणे, महिलेने ही धक्कादायक गोष्ट शेअर केली आहे.
सामंथा गिब्सनने तिचा अनुभव ऑनलाईन शेअर केला आणि सांगितलं की, जेव्हा मी डॉक्टरकडे ब्लड टेस्ट करायला गेले तेव्हा त्यांनी सांगितलं की, मी गर्भवती आहे, एक वर्षापेक्षा जास्त काळ शारीरिक संबंध नसल्याचंही व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.
द सनच्या वृत्तानुसार, समंथा गिब्सनचा हा व्हिडिओ 1 दशलक्षाहून अधिक वेळा पाहिला गेलाय. हा व्हिडीयो पाहून लोक व्हिडिओ पाहून आश्चर्यचकित झाले आहेत. दरम्यान यानंतर समंथाने दुसरा व्हिडिओ शेअर केला आणि म्हणाली, "मला वाटतं डॉक्टरांनी तिच्या ब्लड टेस्टचा अहवाल चुकीच्या पद्धतीने दिला असावा. यामध्ये दुसऱ्याच्या अहवालाची माहिती मिक्स झाली असेल."
समंथा गिब्सन म्हणाली, 'मला काही दिवसांपूर्वी चक्कर येत होती आणि माझ्या पोटात तीव्र वेदना होत होत्या. मला आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा माझ्या पोटात खूप दुखतं होतं. अखेर मी डॉक्टरांकडे गेले. परंतु चाचणीनंतर डॉक्टरांच्या शब्दांनी मला हादरवून सोडलं.
समंथा तिच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये म्हणाली, 'मी डॉक्टरांना सांगितलं आहे की, मी गर्भवती होऊ शकत नाही, कारण मी जवळजवळ एक किंवा दोन वर्षांत शारीरिक संबंध ठेवला नाही. त्यामुळे हे अशक्य आहे. यानंतर त्याने माझी एक स्ट्रिप टेस्ट केली आणि ती निगेटिव्ह आली. यानंतर डॉक्टर म्हणाले की, माझी पुन्हा एकदा ब्लड टेस्ट केली जाईल.
समंथा गिब्सन म्हणाली, 'मी ब्लड टेस्टनंतरही रिपोर्टची वाट पाहतेय. पण कित्येक महिन्यांनंतरही डॉक्टरांचा फोन आला नाही. कारण मी गर्भवती नाहीये. तरीही मला डॉक्टरांकडे जाण्याची गरज आहे, कारण मला अजूनही माझ्या पोटात वेदना होतायत.