Air Fryer मध्ये जेवण बनवणं योग्य की अयोग्य? ऋजुता दिवेकर काय सांगते

Air Fryer Food Side Effects : एअर फ्रायरमध्ये अन्नपदार्थ शिजवण्याचे दुष्परिणाम 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Mar 13, 2024, 06:35 PM IST
Air Fryer मध्ये जेवण बनवणं योग्य की अयोग्य? ऋजुता दिवेकर काय सांगते  title=

झिरो-ऑईल स्वयंपाक आणि कमी तेलाने स्वयंपाक करण्याच्या पद्धती आजकाल लोकांमध्ये लोकप्रिय होत आहेत. अशीच एक पद्धत म्हणजे एअर फ्रायरमध्ये अन्न शिजवणे. जे लोक फिटनेसबद्दल खूप जागरूक असतात किंवा वजन कमी करण्यासाठी तेल-तूप कमी खातात त्यांना एअर फ्रायरसारख्या गोष्टी आवडतात. पण, सामान्य पद्धतीने तेलात तळलेले पदार्थ खाण्यापेक्षा एअर फ्रायरमध्ये शिजवलेले अन्न चांगले आहे का? एअर फ्रायर फूड हेल्दी आहे का? एअर फ्रायरमध्ये शिजवण्याचे फायदे आणि तोटे काय आहेत ते जाणून घेऊया.

एअर फ्रायरचे फायदे काय आहेत? 

एअर फ्रायर वापरण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे अन्न अगदी कमी तेलात शिजवले जाते. म्हणूनच, लोकांना त्यांच्या आवडत्या गोष्टी एअर फ्रायरमध्ये शिजवून खायला आवडतात. एअर फ्रायर वापरण्यासही सोपे आहे ज्यामुळे लोकांचा वेळ वाचतो. कोलेस्ट्रॉल वाढणे, लठ्ठपणा वाढणे आणि बीपी पातळी वाढणे या भीतीने रस्त्यावरचे पदार्थ किंवा तळलेले पदार्थ खाणे अशक्य असलेले बरेच लोक एअर फ्रायरमध्ये बटाट्याचे पॅटिस, समोसे आणि कटलेट यांसारख्या गोष्टी शिजवून खाऊ शकतात.

तज्ज्ञांचे मत काय?

करीना कपूर आणि आलिया भट्ट यांसारख्या सेलिब्रिटींच्या आहारतज्ज्ञ आणि पोषणतज्ज्ञ, ऋजुता दिवेकर यांच्या मते, डीप फ्राईंग किंवा पारंपारिक तळण्यापेक्षा एअर फ्रायिंग पूर्णपणे सुरक्षित आहे. आरोग्यदायी नाही. ऋजुताच्या मते, लोक एअर फ्रायरमध्ये स्वयंपाक करताना खूप खातात. जे चुकीचे आहे. परंतु, तळलेले किंवा तेलकट अन्न योग्य आणि मर्यादित प्रमाणात खाल्ले तर त्यामुळे तुमचे कोणतेही नुकसान होत नाही. जसे की एकाच वेळी अर्धा समोसा किंवा 6-8 पकोडे खाण्यात काही नुकसान नाही. पण, यापेक्षा जास्त तळलेले खाल्ल्याने तुमचे नुकसान होऊ शकते.

एअर फ्रायरमध्ये स्वयंपाक करण्याचे तोटे काय आहेत?

खूप जास्त आचेवर अन्न शिजवल्याने एअर फ्रायरमध्ये ठेवलेल्या अन्नातील सर्व पोषक तत्वे नष्ट होतात.
तांदूळ, कॉर्न आणि काही भाज्या यांसारखे पिष्टमय पदार्थ एअर फ्रायरमध्ये जास्त काळ शिजवल्याने ऍक्रिलामाइड नावाचे संयुग तयार होऊ शकते. हा एक घटक आहे जो कर्करोगाचा धोका वाढवतो.

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)