American Girl kissing allergy: किस केल्याने कोणाचा मृत्यू होऊ शकतो, असं तुम्हाला कोणी सांगितलं तर विश्वास बसेल का? पण अशी एक मुलगी आहे, जिला किस करण्याची भीती वाटते. जर तिने कोणाला किस केलं तर तिचा मृत्यू होऊ शकतो. एका अमेरिकन मुलीने हा दावा केलाय. काय आहे हे प्रकरण? जाणून घेऊया.
किस केल्यास माझा मृत्यू होऊ शकतो असा दावा एका अमेरिकन तरुणीने केला आहे. या तरुणीला एक गंभीर एलर्जी झाली आहे. तिने आपल्या आजाराची माहिती व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियात शेअर केली आहे. तिला मास्ट सेल एक्टिवेशन सिंड्रोम (MCAS) नावाचा एक दुर्मिळ आजार झालाय. यामध्ये खाण्या पिण्याचे असे काही पदार्थ असतात, ज्यामुळे तिच्या शरीरात एलर्जी होऊ लागते.
तरुणीने केलेल्या दाव्यानुसार, MCAS ही एक इम्युन सिस्टिमसंबंधी खाद्य पदार्थांमुळे होणारी एलर्जी आहे. यामुळे तरुणीच्या सेल्समध्ये काही पदार्थांमुळे गंभीर समस्या उत्पन्न होतात. यामुळे तिच्या अंगावर सूज येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, पित्त, जंत, उलटी आणि इतर गंभीर समस्या उद्भवतात.
गंभीर आजार झालेली ही तरुणी बोस्टनला राहते. तिने हसत खेळत आपल्या आपल्या गंभीर आजाराची माहिती दिली आहे. मला किस करायची इच्छा असलेल्या तरुणांना काही अटी आहेत. या अटी पूर्ण केलेला तरुण मला किस करु शकतो.
तरुणीने सांगितल्यानुसार, तिला किस करणाऱअया तरुणाने मागच्या 24 तासात शेंगदाणे, कडधान्य, तिळ, किवी किंवा समुद्री अन्नाचे सेवन केलेले नसावे. कारण मला या गोष्टींची एलर्जी आहे. मला किस करण्याच्या 3 तास आधी त्याने काहीच खाऊ नये ही दुसरी अट आहे. तर किस करण्याआधी त्याने ब्रश करावे ही तिसरी अट तरुणीने सांगितली आहे.
मी सिंगल नाहीय. मला एक बॉयफ्रेण्डदेखील आहे. त्याच्याशी रोमान्स करताना मला किरकोळ एलर्जीचा सामना करावा लागतो, असे ती तरुणी सांगते. यामुळे माझ्या तोंडात खाज सुटते, माझ्या ओठ, जीभेला खाज सुटते. चेहरा थोडा लाल होतो आणि डोक्यात चक्करसारखं वाटतं. मग मी माझे दात ब्रश करते आणि बेनाड्रिलसारखे आपत्कालिन औषध घेते, अशी माहिती तिने आपल्या व्हिडीओतून शेअर केली आहे.