Silent Heart Attack : बदलेली जीवनशैली आणि खाण्याच्या विचित्र सवयीमुळे हृदयविकाराचे (Heart Attack) प्रमाण वाढत आहे. वयोवृद्धांबरोबरच तरुणांमध्येही हार्ट अटॅकचं वाढतं प्रमाण हा चिंतेचा विषय बनला आहे. हृदयाचे ठोके वाढणे, अशक्तपणा किंवा हात सुन्न होणे, छातीत तीव्र वेदना होणे ही साधारणत: हार्ट अटॅकची लक्षणं मानली जातात. पण तुम्ही सायलेंट हार्ट अटॅक (Silent Heart Attack) विषयी ऐकलं आहे का? सायलेंट हार्ट अटॅक हा हृदयविकाराचा झटकाच मानला जातो. पण ज्याची लक्षणे फार कमी असतात. सायलेंट हार्ट अटॅकमुळे छातीत दुखत नाही किंवा श्वासोच्छवासाचा त्रास होत नाही.
छातीत दुखणं, हात-मान दुखणं, अपचन यासारख्या समस्या सामान्य असल्याचा व्यक्तीचा समज होतो. पण ही सायलेंट हार्ट अॅटॅकची लक्षणं असू शकतात जी निरुपद्रवी वाटतात. सामान्य हार्ट अॅटॅकच्या लक्षणांप्रमाणेच सायलेंट हार्ट अॅटॅकचा धोका असतो. यात मधुमेह, हायपरटेन्शन, वृद्धत्व, धूम्रपान, लठ्ठपणा, जीवनशैली, हृदयविकाराची फॅमिली हिस्ट्री, हाय कोलेस्टेरॉल या व्यक्तींना सायलेंट हार्ट अटॅकचा धोका जास्त असतो.
एका अभ्यासानुसार, सुमारे 45 टक्के लोकांमध्ये हृदयविकाराची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. जो सायलेंट हार्ट अटॅक मानला जातो. लोकांना हृदयविकाराचा झटका आधी ओळखता येत नाही. लोकांना योग्य उपचारही मिळत नाहीत. अशावेळी सायलेंट हृदयविकाराचा झटका कसा ओळखायचा ते जाणून घेऊया.
सायलेंट हार्ट अटॅकची लक्षणे
सायलेंट हृदयविकाराच्या झटक्यामध्ये, छातीत दुखण्याऐवजी जळजळ जाणवते.
अशक्तपणा आणि थकल्यासारखे वाटू शकते.
अनेक वेळा सायलेंट ॲटॅकमुळे ॲसिडिटी, अपचन, डिहायड्रेशन आणि थकवा येतो.
जेव्हा हृदयाला रक्तपुरवठा कमी होतो किंवा थांबतो तेव्हा सायलेंट हृदयविकाराचा झटका धोकादायक ठरू शकतो.
सायलेंट हृदयविकाराच्या आधी आणि नंतर बहुतेक लोकांना सामान्य वाटतं.
सायलेंट हृदयविकाराच्या झटक्यानंतर, दुसरा हृदयविकाराचा धोका वाढतो.
सायलेंट हृदयविकाराचा झटका येतो तेव्हा काय करावे
यापैकी कोणतीही लक्षणे दिसल्यास, विलंब न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्यासाठी इलेक्ट्रोकार्डिओग्राम आणि इकोकार्डिओग्रामद्वारे चाचण्या करता येतात. या चाचणीद्वारे हृदयात होणारे बदल ओळखता येतात. तुमच्या स्थितीनुसार, डॉक्टर अँजिओप्लास्टी, हृदय प्रत्यारोपण, बायपास शस्त्रक्रिया यासारख्या उपचारांचा सल्ला डॉक्टर देऊ शकतात
सायलेंट हृदयविकाराचा झटका कसा टाळायचा
अपचन किंवा आम्लपित्त सोबत इतर लक्षणे दिसल्यास घरगुती उपायांऐवजी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
जर तुम्ही हृदयाचे रुग्ण असाल तर तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयींची खूप काळजी घ्या. तुमच्या आहारात हेल्दी आणि फायबर युक्त गोष्टींचा समावेश करा.
जर तुम्ही रक्तदाबाचे रुग्ण असाल तर नियमितपणे स्वतःची तपासणी करून घ्या आणि वेळेवर औषधे घ्या.
दररोज व्यायाम करा, यामुळे तुमचे शरीर आणि इतर अवयव योग्यरित्या कार्य करण्यास मदत करतात आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो. धू
म्रपान आणि दारू आणि सिगारेट यांसारख्या मादक सवयींपासून दूर रहा.
(Disclaimer : वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)
|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.