close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

सफरचंद खाणे आरोग्यास लाभदायक

पोटॅशियम, ग्लूकोज, फॅास्फरस, लोह यांसारखे उपयुक्त द्रव्ये सफरचंदामध्ये असतात.

Updated: Sep 14, 2019, 07:38 AM IST
सफरचंद खाणे आरोग्यास लाभदायक

मुंबई : सफरचंद आपल्या आरोग्यासाठी फार लाभदायक आहे. आरोग्यपूर्ण जीवनशैली प्रत्येकाला हवी असते त्यासाठी रोज एक सफरचंद खायला सुरूवात करा. सफरचंदात मोठ्या प्रमाणात 'लोह' असते, आणि ते एनिमिया सारख्या आजारावर रामबाण उपाय आहे. यात पोटॅशियम, ग्लूकोज, फॅास्फरस, लोह यांसारखे उपयुक्त द्रव्ये असतात, याशिवाय यात 'ब' आणि 'क' जीवनसत्वेही असतात. 

सफरचंदामळे आरोग्यास होणारे फायदे

- सफरचंदामधील क्वरसिटीन पेशींना नुकसानापासून वाचवतो आणि त्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो.

- सफरचंदामध्ये मोठ्या प्रमाणात 'फायबर' असल्यामुळे पचनशक्ती वाढण्यास मदत होते. 
 
- सफरचंदाच्या सालीमुळे कफची समस्या दूर होते. 
 
- सफरचंदाच्या रसात गुलाब जलाचे काही थेंब टाकून चेहर्‍यावर चोळल्यावर सावळा रंग उजळविण्यास मदत होते. 
 
- केसातील कोंडा कमी करण्यासाठी रोज नियमितपणे सफरचंदाचा रस केसांच्या मुळांना चोळावा, थोड्या वेळाने केस स्वच्छ पाण्याने धुवावेत.