close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

डागरहित त्वचेसाठी पाण्यात मिसळा 'हे' पदार्थ

सुंदर दिसण्याची इच्छा प्रत्येकाची असते.

Updated: Sep 12, 2019, 07:15 PM IST
डागरहित त्वचेसाठी पाण्यात मिसळा 'हे' पदार्थ

मुंबई : सुंदर दिसण्याची इच्छा प्रत्येकाची असते. त्यामुळे शरीरात पाण्याचे प्रमाण अधिक असते गरजेचे असते. पण त्यासाठी पिण्याच्या पाण्यात काही पदार्थ मिसळून पिल्याने शरिरास त्याचा लाभ मिळू शकतो. त्यामुळे तुम्ही घरच्या घरी थोडी काळजी घेतली की सुंदर त्वचा मिळवू शकता. 

स्ट्रॉबेरी :- चेहऱ्यावरील थकवा दूर करण्यासाठी आणि तजेलदार त्वचेसाठी पिण्याच्या पाण्यात स्ट्रॉबेरीचा रस मिसळा. यात व्हिटॉमिन सी आणि अॅंटीऑक्सीडेंट असतात. त्यामुळे चेहऱ्यावर तजेला येतो.

लिंबू :- लिंबाचे काही थेंब पाण्यात मिसळ्याने पचनक्रिया सुरळीत होते. शरीरातील विषद्रव्ये बाहेर पडण्यास मदत होते. त्यामुळे चेहरा चमकदार होण्यास मदत होते.

पुदीना :- पुदीन्याचे पाणी प्यायल्याने पोट साफ होते आणि चेहऱ्यावर तजेला येतो. उन्हाळ्यात हे पाणी प्यायल्याने टवटवीत वाटते.

मध :- बॅक्टेरीयांशी लढण्यासाठी मध उत्तम ठरते. मध चेहऱ्याला लावणे जितके फायदेशीर असते तितकेच मध शरीरात घेणेही उपयुक्त ठरते. सकाळी गरम पाण्यात मध घालून प्या.

दालचिनी :- दालचिनीच्या सेवनामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होतो. पिण्याचे पाणी उकळताना त्यात चिमुटभर दालचिनी पावडर आणि सफरचंदाचे काही तुकडे घ्या. त्यानंतर ते गाळून प्या. त्वचा नितळ होऊन सुंदर दिसाल.