1000 रुपये किलोची 'ही' भाजी बीपी, कोलेस्ट्रॉल आणि कर्करोगाच्या रुग्णांसाठी ठरते वरदान

ही भाजी तिच्या अनोख्या आकारामुळे, उत्कृष्ट चवीसाठी, आणि पोषकतत्वांमुळे जगभर लोकप्रिय आहे. भारतात तिला 'हथीचक' असेही म्हणतात. 

- | Updated: Dec 4, 2024, 03:13 PM IST
1000 रुपये किलोची 'ही' भाजी बीपी, कोलेस्ट्रॉल आणि कर्करोगाच्या रुग्णांसाठी ठरते वरदान title=

artichokes vegetable benefits : महागडी, पण पोषक तत्वांनी परिपूर्ण भाजी: 
जगातील सर्वात महागडं फळ तुम्ही खाल्लं असेल पण, कधी सर्वात महागडी भाजी खाल्लीये किंवा पाहिलीये? 1000 रुपये प्रति किलो दराने उपलब्ध असणारे हे सुपरफूड आता भारतीय स्वयंपाकघरातही हळूहळू लोकप्रिय होत आहे. या भाजीचं नाव आहे आर्टिचोक. कमी कॅलरी आणि जास्त फायबर असल्यामुळे ही भाजी वजन कमी करणाऱ्या लोकांसाठी ही अत्यंत फायदेशीर ठरते. 

पोषक घटक:
एका आर्टिचोकमध्ये फक्त 76 कॅलरीज असतात. तर, त्यात 16 ग्रॅम कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी, फोलेट, लोह, आणि पोटॅशियम यांसारखे पोषक घटक भरपूर प्रमाणात असतात. विशेष म्हणजे, यात कोलेस्टेरॉल आणि फॅट अजिबात नसल्याने ही अतिशय आरोग्यदायी आहे.

आर्टिचोकचे फायदे:
1.रोगप्रतिकारशक्ती वाढवते:
आर्टिचोकमध्ये असलेल्या फायटोकेमिकल्समुळे शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीत वाढ होते. यामध्ये 8000 हून अधिक अँटिऑक्सिडंट्स असतात. जे फ्री रॅडिकल्समुळे होणारे पेशींचे नुकसान टाळतात.

2.कर्करोगाचा धोका कमी करते:
या भाजीत असलेल्या पॉलिफेनॉल अँटीऑक्सिडंट्समुळे कर्करोगाच्या पेशींची वाढ थांबते. नियमित सेवन केल्यास कर्करोगाचा धोका कमी होतो.

3.कोलेस्ट्रॉल आणि बीपीसाठी लाभदायक:
आर्टिचोकमधील सायनेरिन नावाचे घटक खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. त्याचबरोबर पोटॅशियममुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य उत्तम ठेवता येते.

4.पचन सुधारते आणि यकृत निरोगी ठेवते:
ही भाजी पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि यकृत डिटॉक्सिफाय करण्यासाठी उपयुक्त आहे. यामुळे इरिटेबल बोवेल सिंड्रोम (IBS) कमी होतो, तसेच यकृताचे नुकसान होण्यापासून बचाव होतो.

5.वजन कमी करण्यासाठी फायदेशीर:
फायबर आणि प्रथिनांनी भरपूर असल्याने आर्टिचोक वजन कमी करण्यास मदत करते. यामुळे पोट भरल्याची भावना जास्त काळ टिकून राहते, ज्यामुळे अतिखाण्याचे प्रमाण कमी होते.

6.त्वचेसाठी फायदेशीर:
आर्टिचोकमधील अँटिऑक्सिडंट्स त्वचेतील चमक वाढवण्यास मदत करतात. तसेच, हे त्वचेला तजेलदार ठेवण्यासही उपयुक्त ठरते.

(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)