या '3' आजाराच्या रूग्णांंनी कलिंंगड खाणं टाळणेच हितकारी

उन्हाळ्याच्या दिवसात डिहायड्रेशनचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी पाण्यासोबतच पाणीदार पदार्थांचा, फळांचा, भाज्यांचा आहारात समावेश करावा. 

Updated: Jun 13, 2018, 09:21 AM IST
या '3' आजाराच्या रूग्णांंनी कलिंंगड खाणं टाळणेच हितकारी  title=

मुंबई : उन्हाळ्याच्या दिवसात डिहायड्रेशनचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी पाण्यासोबतच पाणीदार पदार्थांचा, फळांचा, भाज्यांचा आहारात समावेश करावा. अनेकजण उन्हाचा त्रास कमी करण्यासाठी कलिंगडाचा आहारात समावेश करतात. कलिंगडामध्ये व्हिटॅमिन, मिन्सरल्स, अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक मुबलक प्रमाणात असतात. एक्सपर्ट सल्ल्यानुसार, दिवसभरात वयस्कर व्यक्तीने दिवसभरात 300 ग्राम कलिंगड खाणं पुरेसे आहे. मात्र कलिंगड खाणं काही लोकांसाठी त्रासदायक ठरू शकते.  

मधूमेह - 

पदार्थांमधील नैसर्गिक स्वरूपातील साखर रक्तामध्ये किती पटकन विरघळते यावरून त्याचा ग्लायस्मिक इंडेक्स मोजला जातो. कलिंगडामध्ये नैसर्गिक स्वरूपात साखर मुबलक असते. सुमारे कलिंगडाचा ग्लायस्मिक इंडेक्स 70 आहे. त्यामुळे मधूमेहींनी कलिंगडाचे सेवन प्रमाणात करावे. मधूमेहींनी कलिंगड खाताना त्यामुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी बदाम, अक्रोडचा समावेश करा. 

किडनीविकार 

ज्या लोकांना किडनीशी संबंधित काही आजार असेल अशांसाठी कलिंगडाचे सेवन त्रासदायक आहे. कलिंगडामधील मिनरल घटक किडनीसाठी त्रासदायक आहे. कलिंगडामध्ये मुबलक प्रमाणात पाणी असते. शरीरात मूत्र निर्मिती होण्यामध्ये अडथळा निर्माण होतो त्यांनी कलिंगडाचे सेवन टाळावे. यामुळे हार्ट फेल होण्याचा धोका वाढतो. 

अस्थमा 

अस्थमाचा त्रास असणार्‍यांनी थंड पदार्थांचे सेवन टाळावे. कलिंगडामध्ये पाणी मुबलक प्रमाणात असल्याने अस्थमाच्या रूग्णांनी कलिंगडापासून दूर रहावे. सोबतच कलिंगडामध्ये अमिनो अ‍ॅसिड अधिक प्रमाणात असल्याने कलिंगडावर ताव मारणं टाळणंच अधिक सोयीस्कर आहे.  

कलिंगड खाणे केव्हा टाळाल ?  

संध्याकाळच्या वेळेस कलिंगड खाणं टाळावे. या वेळेत पचनशक्ती मंदावते. कलिंगडातील साखर अशावेळी पचणं कठीण होते. कलिंगड सकाळच्या नाश्त्यानंतर तासाभराने खाणं अधिक फायदेशीर आहे. सामन्यपणे 11-2 या वेळेत पचनशक्ती उत्तम असते. या वेळेत कोणतेही फळं खाणं आरोग्याला फायदेशीर आहे. या टीप्सने विकत घेण्यापूर्वीच ओळखा कलिंंगड गोड आणि रसदार आहे