योगसाधना करताना या ७ चुका टाळा!

शारीरिक-मानसिक समस्या दूर करण्यासाठी योगसाधना करणे हा एक उत्तम उपाय आहे.

Updated: Jun 9, 2018, 08:46 AM IST
योगसाधना करताना या ७ चुका टाळा! title=

मुंबई : आजकालचे जीवनमान धावपळीचे आणि गुंतागुंतीचे आहे. या सगळ्याचा शारीरिक-मानसिक आरोग्यावर विपरित परिणाम होतो. त्यातच आरोग्याची नीट काळजी न घेतल्याने शरीरात तणाव, थकवा, चिडचिडेपणा यांसारख्या समस्या उद्भवतात. या समस्या दूर करण्यासाठी योगसाधना करणे हा एक उत्तम उपाय आहे. पण योगसाधना करण्याचे काही नियम असतात. ते न पाळल्यास फायद्याऐवजी नुकसानच होईल. म्हणून जाणून घेऊया योगसंबंधित काही महत्त्वाचे नियम...

# योग करण्यापूर्वी वार्मअप करणे गरजेचे आहे. थेट आसने करण्यास सुरुवात करु नका. सुरुवातीला हलका व्यायाम केल्याने शरीर लवचिक बनेल.

# जेवल्यानंतर सुमारे ४ तासांनंतर योगसाधना करा. सकाळच्या वेळेस करणार असलात तर रिकाम्या पोटीही योगसाधना करु शकता.

# योग करताना तहान लागल्यास चुकूनही थंड पाणी पियू नका. त्यामुळे नुकसान होईल. कारण योगसाधना केल्यानंतर शरीर गरम होते आणि अशावेळी थंड पाणी प्यायल्यास सर्दी, खोकला, अलर्जीसारख्या समस्या उद्भवतात.

# योगसाधना करण्याच्या सुरुवातीला हलक्या, सोप्या आसनांपासून सुरूवात करा. तुम्हाला योगासनांचा कितीही सराव असला तरी सुरुवातीला कठीण आसने करु नका. शरीर आसनांसाठी पूर्णपणे तयार झाल्याशिवाय आसने केल्यास त्रास होण्याची शक्यता असते.

# कोठेही पाहुन, वाचून आसने करु नका. कारण चुकीची आसने केल्यास नुकसान होऊ शकते. कंबरदुखी, गुडघेदुखी किंवा मसल्स ताणणे अशा समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे नेहमी तज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच योगसाधना करणे योग्य ठरेल.

# योगसाधना केल्यानंतर लगेचच अंघोळ करु नका. कारण व्यायाम किंवा इतर शारीरिक क्रियांनंतर शरीर गरम होते. त्यामुळे व्यायामानंतर काही वेळाने अंघोळ करा.

# योगसाधना करताना मोबाईल जवळपास ठेऊ नका. कारण त्यामुळे लक्ष विचलित होते.