आता बाजारात आले 'आयुर्वेदिक अंडी', फायदे जाणून तुम्हालाही बसेल धक्का

'संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे' हे तुम्ही आजपर्यंत ऐकत आला असाल. अंड खाणं आरोग्यासाठी आरोग्यदायीही असतं. तुम्हीही अंड खाण्याचे शौकीन आहात तर मग तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Mar 6, 2018, 12:21 AM IST
आता बाजारात आले 'आयुर्वेदिक अंडी', फायदे जाणून तुम्हालाही बसेल धक्का title=

मुंबई : 'संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे' हे तुम्ही आजपर्यंत ऐकत आला असाल. अंड खाणं आरोग्यासाठी आरोग्यदायीही असतं. तुम्हीही अंड खाण्याचे शौकीन आहात तर मग तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.

गावठी आणि बॉयलर कोंबडीच्या अंड्यांनंतर आता बाजारात चक्क आयुर्वैदीक अंडी आली आहेत. या एका आयुर्वैदिक अंड्याची किंमत २२.५० रुपये आहे. आता तुम्ही विचार करत असाल की आयुर्वैदिक अंड तयार केलं असेल. हे अंड आयुर्वैदिक कोंबडीचं आहे. पाहूयात काय आहे संपूर्ण प्रकार...

असं तयार करतात अंड

आयुर्वैदिक अंड हे चिन्ना हर्षवर्धन रेड्डी यांनी तयार केलं आहे. अशा प्रकारे अंड तयार करण्यासाठी त्यांनी सखोल अभ्यास केला. अमेरिकेतून एमबीएचं शिक्षण पूर्ण केलेल्या हर्षवर्धन रेड्डी यांनी सौभाग्य ग्रुप नावाने पोल्ट्री बिजनेस सुरु केला आहे.

आंध्रप्रदेशातील रवुलापडू गावात राहणारे चिन्ना हर्षवर्धन रेड्डी यांनी आयुर्वैदिक अंड बनवण्यापूर्वी सहा वर्ष संशोधन केलं. त्यानंतर त्यांना आयुर्वैदिक अंड बनवण्यात यश आलं. 

या ठिकाणी मिळणार आयुर्वैदिक अंडी

आयुर्वैदिक अंड्यांची विक्री तेलुगू भाषी राज्यांसोबतच बंगळुरुमध्ये केली जात आहे. सामान्यत: अंड्याच रंग हा सफेद असतो. मात्र, सौभाग्यतर्फे बनवण्यात येणाऱ्या अंड्याचा रंग गुलाबी आहे. या अंड्याची किंमत जास्त असतानाही त्याला नागरिकांची मोठी मागणी मिळत आहे. 

पोल्ट्री फार्ममध्ये कोंबड्यांनी जास्त अंडी देण्यासाठी त्यांना इंजेक्शन्स दिली जातात. मात्र, या कोंबड्यांना दिला जाणारा आहार हा पूर्णपणे आयुर्वैदिक आहे.

कोंबड्यांचा आहार 

सौभाग्य हैतचेरीच्या कोंबड्यांना विविध पोषणतत्व असलेलं खाद्य दिलं जातं. या खाद्यात लसुन, हळद यासोबतच ४० आयुर्वैदिक खाद्यांचं मिश्रणही दिलं जातं. या कोंबड्यांना मिनरल वॉटर दिलं जातं. त्यामुळे या कोंबड्यांपासून मिळणार अंड हे खूपच आरोग्यदायी असतं.

दोन प्रकारची अंडी उपलब्ध 

सौभाग्य पोल्ट्री तर्फे बनवण्यात येणारी 'आयुर्वैदिक अंडी' दोन प्रकारची आहेत. पहिलं आयूर प्लस आणि दुसरं गावठी कोंबडीचं अंड. आयूर प्लस कोंबड्यांच्या एका अंड्याची किंमत १२.५० रुपये आहे. तर, गावठी कोंबडीच्या एका अंड्याची किंमत २२.५० रुपये आहे.

आयुर्वेदिक अंड्याचे फायदे

आयुर्वेदिक अंड हे सामान्य अंड्यापेक्षा अधिक लाभदायक आहे. हे अंड लहान मुलांसाठी आणि प्रौढांसाठीही आरोग्यदायक आहे. हे खंड खाल्ल्याने हाड मजबूत होतात. तसेच मानसिक क्षमता आणि रोग प्रतिकारक शक्तीही वाढते. हे अंड खाल्ल्यास ब्रेस्ट कँसरचा धोका कमी असतो असा दावा कंपनीतर्फे करण्यात येत आहे.