हाता-पायाला एकूण 25 बोटे असलेल्या बालकाचा जन्म झाला आहे. या मुलाच्या जन्मानंतर त्याला पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी होते आणि लोकांना याबद्दल जाणून आश्चर्यही वाटत आहे. मुलाच्या जन्मानंतर कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. घरातील सदस्य हा देवीचा विश्वास असल्याच सांगतात. मुलाच्या उजव्या हाताला 6 आणि डाव्या हाताला 7 बोटे आहेत. दोन्ही पायांना 6-6 बोटे आहेत. कुटुंबीयांनी मुलाला देवीचा आशीर्वाद म्हटले आहे.
हे प्रकरण कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील आहे. बनहट्टी तालुक्यातील सनशाईन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये एका बाळाचा जन्म झाला. मुलाच्या दोन्ही हात आणि पायाला एकूण 25 बोटे आहेत. साधारणत: मानवी शरीरात केवळ 20 बोटे असतात, अशा स्थितीत नवजात बालकाच्या शरीरात 25 बोटे असल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे. असे सांगितले जात आहे की मुलाच्या दोन्ही पायात एकूण 12 बोटे आहेत, तर दोन्ही हातांना मिळून 13 बोटे आहेत. मुलाच्या उजव्या हाताला 6 आणि डाव्या हाताला 7 बोटे आहेत. दोन्ही पायांना 6-6 बोटे आहेत. ही दुर्मिळ स्थिती पाहून डॉक्टरही आश्चर्यचकित झाले आहेत.
डॉक्टरांच्या मते, ही एक दुर्मिळ घटना आहे आणि गुणसूत्रांमध्ये बदल झाल्यामुळे असे घडते. डॉक्टरांनी सांगितले की, चांगली गोष्ट म्हणजे या अनोख्या प्रसूतीनंतर बाळ आणि त्याची ३५ वर्षीय आई भारती पूर्णपणे निरोगी आहेत. घरातील सदस्य याला देवीचा आशीर्वाद मानत आहेत. मुलाचे वडील गुरप्पा कोनूर यांच्या म्हणण्यानुसार, कुटुंबातील सर्व सदस्य ग्रामदेवी भुवनेश्वरी देवीचे भक्त आहेत. अशा परिस्थितीत केवळ देवीच्या आशीर्वादामुळेच त्यांच्या घरी अशा दुर्मिळ बालकाचा जन्म झाल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. या दुर्मिळ बालकाला पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.
ही एक दुर्मिळ घटना आहे आणि गुणसूत्रांमध्ये बदल झाल्यामुळे असे घडते, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. पुढे डॉक्टर म्हणाले की, चांगली गोष्ट म्हणजे या अनोख्या प्रसूतीनंतर बाळ आणि त्याची 35 वर्षीय आई भारती सुदृढ आहेत. घरातील सदस्य याला देवीचा आशीर्वाद मानत आहेत. मुलाचे वडील गुरप्पा कोनूर यांच्या म्हणण्यानुसार, कुटुंबातील सर्व सदस्य ग्रामदेवी भुवनेश्वरी देवीचे भक्त आहेत. देवीच्या आशीर्वादामुळेच त्यांच्या घरी एवढ्या दुर्मिळ बालकाचा जन्म झाल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. या दुर्मिळ बालकाला पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.