beauty tips: रातोरात ब्लॅक हेड्स होतील नाहीसे...हे आहेत रामबाण उपाय...

अनेकजण जुने झालेले टुथब्रश (toothbrush) फेकून देतात किंवा घरात इतर वस्तू स्वच्छ करायला त्याचा वापर करतात. मात्र नाकावरील ब्लॅकहेड्सचा  (blackheads) त्रास कमी करण्यासाठी टुथब्रश मदत करतो. 

Updated: Dec 6, 2022, 03:16 PM IST
beauty tips: रातोरात ब्लॅक हेड्स होतील नाहीसे...हे आहेत रामबाण उपाय...  title=

Skin Care Tips : सुंदर राहणं प्रत्येकालाच आवडत, पण प्रदूषण, वातावरणातील धूर, धूळ यासोबतच शरीरातील हार्मोनल बदलांमुळे चेहर्‍यावर ब्लॅक हेड्स वाढण्याचं प्रमाण बळावतं. चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स तुमच्या सौंदर्यात आडकाठी आणतात ते दिसायला फार खराब दिसते. 

का येतात ब्लॅक हेड्स  (Reasons of black heads)

नाकाजवळ तेल ग्रंथी (oil glands near nose) अधिक प्रमाणात असल्याने या भागावर ब्लॅक हेड्स वाढण्याचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे तेलकट त्वचेच्या (oily skin) लोकांनी विशेष काळजी घेणं आवश्यक आहे

आणखी वाचा: Winter skincare : थंडीत दही बनवेल स्किनला आणखी सॉफ्ट...ड्राय स्किनची चिंताच विसरा

कसे दूर कराल ब्लॅकहेड्स ?  (how to remove blackheads)

ब्लॅकहेड्सचा त्रास कमी करण्यासाठी प्रत्येक वेळेस महागड्या ब्युटी ट्रीटमेंटची (beuty treatments) गरज नसते. काही वेळेस घरगुती उपायांनीही ब्लॅकहेड्सचा त्रास कमी करता येऊ शकतो. 

बेकिंग सोडा -  (baking soda)

बेकिंग सोड्यामध्ये गुलाबपाणी (rose water) किंवा साधं पाणी मिसळा. ही पेस्ट नाकावर लावा. किंवा ज्या ठिकाणी ब्लॅकहेड्सचा त्रास असेल तेथे ही पेस्ट लावा. पेस्ट सुकल्यानंतर पॅक खेचून काढा किंवा बोटांनी थोडा रगडा.  

चारकोल पॅक  (charcol pack)

अ‍ॅक्टिव्हेटेड चारकोल (activated charcol) आणि त्वचेला पुरक अशा पिल ऑफचं (peel off) मिश्रण बनवा, चेहर्‍यावर हा पॅक लावल्यानंतर काही वेळ सुकू द्यावा. 15-20 मिनिटांनी हा पॅक खेचून काढल्यास रातोरात ब्लॅकहेड्स आणि मृत पेशींचा थर निघून जातो. 

टुथब्रश (toothbrush)

अनेकजण जुने झालेले टुथब्रश फेकून देतात किंवा घरात इतर वस्तू स्वच्छ करायला त्याचा वापर करतात. मात्र नाकावरील ब्लॅकहेड्सचा त्रास कमी करण्यासाठी टुथब्रश मदत करतो. 

मध आणि साखर  (honey and sugar)

साखर हे उत्तम स्क्रबर (scrubber) आहे. साखर आणि मधाचं मिश्रण बनवून नाकावर रगडल्याने ब्लॅकहेड्सचा त्रास कमी होण्यास तसेच त्वचा मुलायम होण्यास मदत होते.