Beer Benefits in Marathi: दारु ही आरोग्यासाठी हानिकारक मानली जाते. मात्र बिअरचे सर्व संशोधन असे सूचित करते की, जर बिअर मर्यादित प्रमाणात घेतली तर आरोग्याला (Beer Health Benefits) अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकते. आजकाल अनेकांमध्ये तणाव, अस्वस्थता आणि थकवा खूप सामान्य झाले आहे. तर काही लोक आनंदाचे क्षण सेलिब्रेट करण्यासाठी बिअर पितात. मात्र वैज्ञानिकांच्या अभ्यासातून असे निर्देशनात आले की, जी लोकं एका दिवसात 946 मिली बिअर पितात त्यांना स्मृतीभ्रंशा त्यांना हा त्रास एका तृतियांश पेक्षा कमी होतो. आणि जे लोक बिअर पित नाही त्यांना इतर आजारांचा सामना करावा लागू शकतो असा दावा करण्यात आला आहे.
दरम्यान अल्कोहोल मर्यादित प्रमाणात घेतल्यास आरोग्यासाठी काही फायदे होऊ शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. हार्डड्रिंक, बिअर, जिन, वोडका इत्यादी दारूचे अनेक प्रकार आहेत. अलीकडेच शास्त्रज्ञांनी बीअर पिणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आणली आहे. रोज रात्री बिअर प्यायल्याने स्मृतिभ्रंशाचा धोका कमी होऊ शकतो, असा दावा त्यांनी केला आहे. याचा अर्थ असा नाही की, तुम्ही जास्त प्रमाणात मद्यपान कराल कारण संशोधनात स्पष्टपणे नमूद केले आहे की बीअर फार कमी प्रमाणात पिण्याचे काही फायदे आहेत.
वाचा : हार्ट अटॅकमधून सावरताच Sushmita Sen च्या हाती तलवार! सोशल मीडियावर वारंवार पाहिला जातोय Video
ऑस्ट्रेलियन संशोधकांनी 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 25,000 लोकांच्या मद्यपानाच्या सवयी पाहिल्या आणि त्यावर संशोधन केले. त्यामध्ये जे लोक दररोज 946 मिली बिअर पितात त्यांची स्मरणशक्ती कमी होते. या संशोधनानुसार मद्यपान न करणार्यांना सर्वात मोठा धोका होऊ शकतो. कारण मद्यपान न करणार्यांना मद्यपान करणार्यांपेक्षा पाचपट जास्त स्मृतिभ्रंश होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. जे लोक बिअर पीत नाहीत त्यांच्यामध्ये स्मृतिभ्रंश टिकून राहण्याची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. या संशोधनामुळे केवळ मध्यम मद्यपान करणाऱ्या लोकांवर सकारात्मक परिणाम दिसून आला. तसेच बिअर अती प्रमाणाच पियालाने आरोग्याला धोकाही निर्माण होऊ शकतो.
तसेच मध्यम प्रमाणात मद्यपान केल्याने कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते. मात्र संशोधनात वापरण्यात आलेला डेटा हा संशोधनात सहभागी असलेल्या लोकांनी दिला असल्याचेही शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. काही संशोधनात असेही आढळून आले आहे की, वाइन स्वतः डिमेंशियापासून संरक्षण करू शकते.
जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने उच्च रक्तदाब, पक्षाघात, यकृताचे आजार आणि काही प्रकारचे कर्करोग तसेच स्मृतिभ्रंशाचा धोका वाढतो. तर एका संशोधनातून असे दिसून आले की, ज्या लोकांनी कधीही दारू प्यायली नाही त्यांना मद्यपान करणाऱ्यांपेक्षा स्मृतिभ्रंश होण्याची शक्यता जास्त असते. अल्कोहोल मेंदूच्या पेशींसाठी विषासारखे कार्य करू शकते. म्हणून जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने मेंदूची कार्यपद्धती बदलते आणि शरीराला जीवनसत्त्वे शोषून घेण्यापासून प्रतिबंधित करते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही. कृपया तज्ञांचा सल्ला घ्या.)