Home Remedies for Periods Cramps: महिलांसाठी मासिक पाळी अतिशय वेदनादायी असते. पुरुष या वेदनांचा विचारही करू शकत नाही. अशात पिरीएड दरम्यान महिलांच्या पोटात येणारे क्रॅप्स नक्कीच महिलांच्या दैनंदिन आयुष्यावर पारिणाम करणारे असतात. म्हणूनच आज आपण जाऊन घेणार आहोत मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या पोटदुखीवरील घरगुती उपायांबाबत...
अमेरिकन काँग्रेस ऑफ ओब्स्टेट्रिशियन अँड गायनॅकोलॉजिस्ट ( ACOG ) च्या माहितीप्रमाणे शरीरात प्रोस्टाग्लॅडीन नामक संयुग असतात ज्यामुळे महिलांना मासिक पाळी येते. दर महिन्याला मासिक पाळी सुरु होण्याआधी गर्भाशायात प्रोस्टाग्लॅडीनचा स्तर वाढतो. यामुळे मासिक पाळीमुळे महिलांच्या पोटात दुखतं. प्रत्येक महिलेमध्ये त्यांना मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या त्रासाची गंभीरता कमी जास्त असू शकते. काहींना मासिक पाळीदरम्यान काहीच त्रास होत नाही तर काहींना भयंकर त्रास होऊ शकतो.
जाणून घेऊयात पिरीएड क्रॅम्प्सवरील घरगुती उपाय
मासिक पाळीच्या त्रासापासून रिलीफ हवा असेल तर योगासने केल्याने फायदा होऊ शकतो. तुम्ही नियमित योगासने केलीत तर तुमचा मासिक पाळीदरम्यानचा त्रास कमी होण्यास मदत होते.
गर्भाशय हे मांसपेशींपासून तयार झालेलं असतं. अशात मांसपेशींच्या दुखण्याला ज्यापासून रिलीफ मिळतो असे उपाय तुमचा पिरीएड क्रॅम्प्सवर फायद्याचे ठरू शकतात. म्हणूनच तुम्ही पिरीएड क्रॅम्प्सदरम्यान पोटाला हीटिंग पॅडने शेक दिल्यास तुम्हाला आराम मिळू शकेल. द जर्नल ऑफ फिजिओथेरपी मध्ये याबाबत एक लेख प्रसिद्ध साला आहे, ज्यामध्ये मासिक पाळीत पोटाला हीटिंग पॅडने शेक दिल्यास आराम मिळतो हे सिद्ध झाल्याचं म्हंटलं आहे.
मासिक पाळीसाठी ऍक्युपंक्चर तंत्राचा वापर नवा नाही. जुन्या आशियायी उपचार पद्धतीत याचा समावेश करण्यात आला आहे. या तंत्राच्या वापराने मज्जासंस्थेला आराम मिळतो. यामुळे शरीरातील रक्ताभिसरणास मदत होते. शरीरातील अंतर्गत सूज देखील कमी होते. मासिक पाळीत ऍक्युपंक्चर तंत्राचा वापर केल्याने कोणत्याही दुष्परिणामांशिवाय आराम मिळू शकतो
मासिक पाळीच्या त्रासापासून आराम मिळवण्यासाठी विशिष्ट प्रकारचा चहा फायद्याचा ठरू शकतो. अशात पाळी दरम्यान हर्बल चहा महिलांना फायद्याचा ठरू शकतो. मासिक पाळीदरम्यान केमोमाइल किंवा पेपरमिंट हर्बल चहा पिण्याने पोटदुखी कमी होऊ शकते.
best home remedied for periods cramps women health news in marathi