मुंबई : घाम, धूळ-माती, प्रदूषण, इत्यादीमुळे चेहऱ्याच्या छिद्रांमध्ये घाण जमा होते, तेव्हा ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्स आपल्या चेहऱ्यावर येतात. ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्समुळे आपण अस्वस्थ होतो. तसेच यामुळे चेहऱ्याचे सौंदर्य कमी होते. त्यात जर आपण त्यांना हाताने दाबून काढण्याचा प्रयत्न केला, तर आपल्या चेहऱ्यावर त्याचे डाग येतात. परंतु आठवड्यातून 2 ते 3 वेळा एक गोष्ट केल्यामुळे आपण ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्सच्या समस्येपासून मुक्त होऊ शकता.
आपण घरीच नैसर्गिकरित्या ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्सच्या समस्येपासून मुक्त होऊ शकता. यासाठी, आपल्याला आठवड्यातून 2 ते 3 वेळा खाली दिलेल्या पद्धत वापराव्या लागतील आणि ज्यामुळे आपल्या विना डागाचा एक सुंदर चेहरा मिळेल.
1 टीस्पून साखर (घरी बारीक दळलेली)
1 टीस्पून गुलाब पाणी
1 टीस्पून तांदळाचे पीठ
1 टीस्पून एलोवेरा जेल
वरील सर्व गोष्टी मिसळून स्क्रब पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट 2 मिनिट चेहऱ्यावर स्क्रब करा आणि अशीच चेहऱ्यावर कोरडी होऊ द्या. दोन मिनिटांनंतर गोलाकारपद्धतीने पुन्हा हलके हातांनी मालिश करा. सुमारे 3 मिनिटे मालिश केल्यानंतर, साध्या पाण्याने चेहरा धुवा.
1. स्क्रबच्या स्वरूपात तांदळाचे पीठ मृत पेशी काढून टाकण्यास मदत करते आणि यामुळे त्वचेवर नवीन पेशी वाढण्यात मदत होते.
2. साखरेमध्ये पर्याप्त प्रमाणात ग्लायकोलिक्स अॅसिड असते, ज्यामुळे त्वचेचा खरा रंग बाहेर येण्यास मदत होते. त्याचबरोबर त्वचेतील घाण साफ केल्याने ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्सपासून मुक्त होते.
3. एलोवेरा जेल त्वचेला नैसर्गिकरित्या मॉइश्चरायझर करण्यात मदत करते.
4. गुलाबाचे पाणी चेहऱ्यावर जास्त तेल येण्यापासून प्रतिबंधित करते आणि चेहऱ्याची पीएच पातळी संतुलित ठेवते.