तुमच्या हात, पाय आणि चेहऱ्याला येते का सूज? मग तुम्ही 'या' 5 आजारांनी त्रस्त आहात

आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव कोणत्या ना कोणत्या प्रकारे एकमेकांशी जोडलेला असतो. एका भागातील समस्या दुसऱ्या भागावरही परिणाम करू शकतात.

Updated: Jul 7, 2022, 03:58 PM IST
तुमच्या हात, पाय आणि चेहऱ्याला येते का सूज? मग तुम्ही 'या' 5 आजारांनी त्रस्त आहात title=

मुंबई : आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव कोणत्या ना कोणत्या प्रकारे एकमेकांशी जोडलेला असतो. एका भागातील समस्या दुसऱ्या भागावरही परिणाम करू शकतात. तुमच्या लक्षात आले असेल की, कधीकधी आपल्या शरीरावर, चेहऱ्याभोवती आणि डोळ्याभोवती अचानक सूज येते, ज्याकडे आपण बऱ्याचदा दुर्लक्ष करतो. परंतु हे अनेक प्रकाच्या रोगांचे लक्षण असू शकते.जर तुम्हाला ही समस्या वारंवार होत असेल तर समजून घ्या की तुम्ही अशा 5 आजारांनी त्रस्त असू शकता. ज्यावर तुम्ही लवकरात लवकर उपचार केले पाहिजे, अन्यथा समस्या वाढणे साहजिक आहे.

डीप वेन थ्रोम्बोसिस (Deep Vein Thrombosis) :

हा एक आजार आहे ज्यामुळे पायांना सूज येते, याशिवाय पायांच्या नसांमध्ये रक्त गोठण्याची समस्या वाढवते. जे वेदना वाढण्याचे कारण बनते. शरीराच्या काही भागात रक्ताच्या गुठळ्या जमा झाल्यामुळे पायांना सूज येऊ लागते.

हृदयविकार (Heart Disease) :

हृदयातील समस्या हे इतर अनेक आजारांचे कारण असू शकते. अशा स्थितीत हात आणि मांडीवर सूज येऊ लागते. अशा परिस्थितीत या धोक्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.

लिव्हरसंबंधी आजार  (Liver Disease) :

शरीराच्या या भागात काही समस्या असल्यास तुम्ही खूप आजारी पडता. लिव्हरच्या विकारामुळे पोटात सूज वाढू लागते, त्यामुळे जेव्हा पोटासंबंधीत अशी कोणती समस्या उद्भवली तर नक्कीच तुमची तपासणी करून घ्या.

थायरॉईड (Thyroid) :

हा आपल्या शरीरातील एक अत्यंत महत्त्वाचा संप्रेरक आहे, जो कमी-अधिक प्रमाणात स्राव होऊ लागला, तर शरीराला समस्या निर्माण होऊ शकतात. घसा आणि पायांना सूज वाढत असेल, तर त्यामागे 'हायपोथायरॉडीझम' कारणीभूत असू शकतो.

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)