How To Boost Sex Drive: जर तुम्हीही या चुका करत असाल, तर तुमचं लैंगिक आयुष्य आहे धोक्यात

असं म्हणतात की एका चांगल्या नात्यासाठी तुमचं लैंगिक आयुष्यही तेवढंच हेल्थी असणं गरजेचं आहे

Updated: Aug 20, 2022, 06:17 PM IST
How To Boost Sex Drive: जर तुम्हीही या चुका करत असाल, तर तुमचं लैंगिक आयुष्य आहे धोक्यात title=

How To Boost Sex Drive: असं म्हणतात की एका चांगल्या नात्यासाठी तुमचं लैंगिक आयुष्यही तेवढंच हेल्थी असणं गरजेचं आहे. मात्र, कळत नकळत कपल्सकडून काही अशा चुका होतात ज्यानं तुमच्या रिलेशन आणि लैंगिक आयुष्यावर परिणाम होतो. म्हणूनच कपल्समध्ये हेल्थी लैंगिक आरोग्य असणं ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. जर  तुमच्या काही लहानसहान चुकांमुळे तुमच्या रिलेशनवर आणि त्यामुळे लैंगिक आयुष्यावर परिणाम होतोय असं वाटत असेल तर ही बातमी वाचाच 

संवादाची कमतरता  

एकदुसऱ्याशी संवाद ठेवणं अत्यंत महत्त्वाची बाब आहे. जर तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत बोलतच नसाल, आपले विचार, आपल्या दैनंदिन आयुष्यात घडलेल्या घटना शेअर करत नसाल, तर त्याचे गंभीर परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात. तुमच्या पार्टनरशी संवाद ठेवल्याने कदाचित तुम्हाला काही गोष्टींबाबत असुरक्षित वाटू शकतं. मात्र, संवाद ठेवल्याने तुम्हाला बेडरूममध्ये डिस्कनेक्टेड वाटणार नाही. तुम्ही एकदुसऱ्याशी व्यक्तिगत आयुष्यात एकरूप होणं गरजेचं आहे. 

तंत्रज्ञनापासून जरा दूर राहा 

तुम्ही एकदुसऱ्यासोबत 'तो' क्वालिटी टाईम घालवताना तुमचे मोबाईल फोन, त्यावर येणारे नोटिफिकेशन्स, तुम्हाला येणारे कॉल्स, यापासून जरा दूर राहा. यामुळे तुमची एकाग्रता कमी होऊ शकते. वारंवार तुम्ही मोबाईल किंवा कॉल्सला महत्त्व देत असाल, तर तुमच्या पार्टनरला कदाचित ते आवडणार नाही. यामुळे तुम्हला आणि तुमच्या पार्टनरला पूर्ण लैंगिक सुख अनुभवता येणार नाही. 

वारंवार गोळ्या किंवा औषधं घेणं 

तुम्ही सेवन करत असलेली अनेक औषधं आणि गोळ्या थेट तुमच्या लैंगिक आरोग्यावर परिणाम करत असतात. नव्या रिसर्चनुसार जी माणसं वारंवार ड्रग्सचं सेवन करतात त्यांचं लैंगिक आयुष्य सुधृढ राहत नाही. 

फिटनेस महत्त्वाचा 

नियमित व्यायाम करणं अत्यंत गरजेचं आहे. नियमित व्यायामाने तुमच्या शरीरातील रक्ताभिसरण व्यवस्थित राहतं. व्यायामाने तुमच्या धमन्यांमध्ये नायट्रिक ऑक्साइड तयार होतं. याचा चांगला परिणाम तुमच्या लैंगिक उत्तेजनेवर होत असतो. ज्या व्यक्ती व्यायाम करत नाही, त्यांच्यात लैंगिक उत्तेजनेची कमतरता पाहायला मिळते. तुम्ही फिट असाल तर तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि सोबतच सेक्स ड्राईव्ह देखील वाढते. 

अनावश्यक तणाव 

आपल्या सर्वांना ठाऊक आहे की सेक्स हा एक उत्तम स्ट्रेस बस्टर आहे. मात्र, तुम्ही कोणत्याही गोष्टीचा खूप ताण घेत असाल तर त्याचा तुमच्या सेक्स लाईफवर विपरीत परिणाम होऊ शकतो. ताण तणावाने तुमची कामेच्छा संपू शकते. 

विश्वासाची कमतरता 

काही जुन्या भांडणांमुळे तुमच्या नात्याला तडा गेला असेल किंवा तुमच्यात विश्वासाची कमतरता असेल तर याचाही थेट परिणाम तुम्हाला बेडरूममध्ये पाहायला मिळू शकतो. त्यामुळे एकमेकांवर विश्वास ठेवा. याने, तुमचं नातं अधिक घट्ट होण्यास मदत होईल. सोबतच तुमचं लैंगिक आयुष्यही उत्तम राहील. 

( विशेष नोंद - सदर माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. zee 24 taas या माहितीच्या सत्य असत्यतेची पुष्टी करत नाही. याचा वापर सामान्य आयुष्यात करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)