What is Bra Strap Syndrome : अनेकदा महिलांना हात, मान आणि खांद्यामध्ये वेदना होतात आणि त्यामागचं कारण बऱ्याचदा कळतंच नाही? जर तुम्हाला शरीराच्या या भागांमध्ये खूप दिवसांपासून वेदना होत असतील तर त्यामागे 'ब्रा' हे कारण असू शकते. बहुतेक महिलांना हेही कळत नाही की, त्यांनी घातलेली ब्रा त्यांच्या आरोग्यावर किती वाईट परिणाम करत आहे. हे ऐकून थोडं विचित्र वाटेल, पण प्रत्यक्षात ब्राचे शरीरावर अनेक वाईट परिणाम होतात.
दरवर्षी 13 ऑक्टोबर रोजी 'नॅशनल नो ब्रा डे' साजरा करतो. या दिवशी महिला ब्रा घालत नाही. स्तन हा महिलांच्या शरीरावरील महत्त्वाचा भाग आहे. अशावेळी ब्रा ही महिलांच्या कपड्यांधील महत्त्वाचे अंतर्वस्त्र मानले जाते. पण अनेकदा ब्रा घालताना महिला चूका करतात. त्या चुका कोणत्या आणि 'ब्रा स्ट्रॅप सिंड्रोम' हा आजार कोणता? तो कशामुळे होतो हे सगळे जाणून घेणार आहोत?
NCBI च्या रिपोर्टनुसार, 'ब्रा स्ट्रॅप सिंड्रोम' याला वैद्यकीय भाषेत कॉस्टोक्लॅविक्युलर सिंड्रोम असेही म्हणतात. जड स्तन असलेल्या स्त्रिया जेव्हा पातळ स्ट्रिप ब्रा घालतात तेव्हा त्यांच्या स्तनांचा संपूर्ण भार ब्रावर पडतो. यामुळे, ब्राच्या पट्ट्या खांद्यावरून खेचू लागतात आणि त्यांच्यावर जास्त दबाव येतो, ज्यामुळे खांद्यामध्ये तीव्र वेदना होऊ लागतात. ही समस्या सामान्यतः पातळ-पट्टेदार करणाऱ्या ब्रासह दिसून येते.
ब्रा पट्ट्या खांद्यावर दबाव निर्माण करतात आणि मान, खांदे, पाठ आणि हात दुखतात. ब्रा मुळे होणारी समस्या अधिकतर लठ्ठपणा आणि जड स्तनांचा त्रास असलेल्या महिलांमध्ये दिसून येते. 'ब्रा स्ट्रॅप सिंड्रोम' ग्रस्त महिलांना अनेकदा मान आणि खांदे दुखतात. काही वेळा या दुखण्यामुळे त्यांना त्यांची दैनंदिन कामे करण्यात खूप अडचणी येतात.
ब्रा मुळे होणा-या दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही झोप आणि विश्रांतीची मदत घेऊ शकता, म्हणजेच विश्रांती घेऊन किंवा झोपून तुम्हाला या दुखण्यापासून आराम मिळू शकतो. आराम करून किंवा झोपल्यानंतरही तुमची समस्या दूर होत नसेल, तर स्ट्रॅपलेस किंवा रुंद बँड असलेली ब्रा घेण्याचा प्रयत्न करा. वेदनासह जड काहीही उचलणे टाळा. खांदे, हात आणि मानेशी संबंधित व्यायाम करा आणि आवश्यक असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. रात्रीझोपताना ब्रा न घालता झोपणे हे देखील आरोग्याच्या दृष्टीकोनातून चांगले असते.