Breast Cancer Signs: आजकाल आपण पाहतोय महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण झपाट्याने वाढत चाललं आहे. आपल्या जवळच्या , ओळखीतल्या कुणा ना कुणाला ही समस्या असल्याचं आजकाल आपण सर्रास पाहतोय. अहवालानुसार भारतामध्ये (breast cancer in india) झपाट्याने वाढणारी समस्या आहे. स्तनांच्या कॅन्सरचं प्रमाण आणि रुग्ण आजघडीला भारतात (Breast Cancer Patient) खूप आढळत आहेत. कुठल्याही आजाराची पुष्टी होण्याआधी जर त्याची आधीच माहिती असली (Breast Cancer Precaution) तर आपण वेळेत उपचार करू शकतो आणि कॅन्सरसारख्या गंभीर आजारापासून स्वतःच रक्षण करू शकतो .
महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाची तपासणी करण्यासाठी डॉक्टरांकडून स्तन तपासणी (breast cheacking screening ) आणि मॅमोग्राम (स्तन एक्स-रे) (x-ray , mamogram) यांचा वापर केला जातो.(breast cancer screening)
ही तपासणी स्तनाच्या कर्करोगाची कोणतीही लक्षणे (cancer symptoms) नसलेल्या स्त्रियांमध्ये केली जाते जेणेकरुन कर्करोगाविषयी सुरुवातीच्या टप्प्यात माहिती मिळेल.
डेन्स स्तन (heavy breast womens breast cancer chances) असलेल्या रुग्णांसाठी अल्ट्रासाऊंड (ultrasound) केले जाते. तसेच, ज्या स्त्रियांना स्तनाच्या कर्करोगाचा धोका जास्त असतो अशा स्त्रियांमध्ये MRI चा वापर केला जातो.
या तपासणींमुळे रुग्णांना प्रार्थमिक माहिती मिळते आणि लवकर उपचार घेऊ शकतो ज्यामुळे नंतर होणार त्रास आणि वेदना शिवाय मृत्यूसुद्धा रोखू शकतो.
प्रत्येक स्त्रीने दरवर्षी स्तनाच्या कर्करोगाची तपासणी केली पाहिजे. वयाच्या चाळीशीत पोहचल्यावर महिलांनी आवर्जून कर्करोगाची तपासणी करून घ्यावी.वयाच्या सत्तरी पर्यंत नियमितपणे चाचणी करत राहावी. (डॉ ब्रेस्ट कॅन्सर स्क्रिनिंग आफ्टर ४० इयर age)
जेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे तपासणीसाठी जाता तेव्हा डॉक्टर तुमच्या काही माहितीच्या आधारावर एक कॅल्क्युलेशन (calculation) करतात जस कि तुमची मासिक पाळी (menstruation days) सुरु झालेलं वय,पहिल्या मुलाचा जन्माच्या वेळी असणार वय, घरात जवळच्या कोणाला ब्रेस्ट कॅन्सरची हिस्टरी असे अनेक गोष्टींची माहिती घेऊन अंदाज बांधतात.
जर एखाद्या महिलेच्या कुटुंबातील सदस्याला स्तनाचा कर्करोग झाला असेल किंवा स्तनाचा कर्करोग होऊ शकतो अशी जीन्स असतील तर MRI स्क्रीनिंगचा उपयोग मॅमोग्राफीला पूरक करण्यासाठी केला जातो. कुटुंबातील उर्वरित महिलांची तपासणी सुरू केली जाते. ही तपासणी वयाच्या ३० वर्षापूर्वी केली जात नाही.
घाई करू नका : सेल्फ स्क्रीनिंग करताना नेहमी लक्षात ठेवा, प्रत्येक स्तनावर कमीतकमी ५ मिनिट लक्ष द्या.. जर घाईघाईत केलंत तर मात्र काही गोष्टी तुमच्या लक्षात येणार नाहीत
पीरियड्स दरम्यान स्क्रिनिंग करू नका: मासिक पाळीदरम्यान स्तनांचा स्क्रिनिंग करू नका बऱ्याचदा मासिक पाळीदरम्यान हार्मोन्स बदललता आणि त्यामुळे स्तनांचा आकार लहान मोठा असतो.. ते थोडे जाड आणि वेदनादायीसुद्धा असतात त्यामुळे आपल्याला योग्य माहिती मिळणार नाही..
चुकीच्या पद्धतीची माहिती : ब्रेस्ट तपासणी स्वतः करणार असाल तर योग्य माहिती आधी मिळवा डॉक्टरचा सल्ला घ्या,बऱ्याचदा कोणतेही व्हिडीओ पाहून आपण त्यांच्या आधारे तपासणी करतो आणि आपली फसगत होऊ शकते.
बऱ्याचदा महिला स्तन तपासतांना अंडरआर्म्स , निपल्स आणि आणि स्तनांच्या खालील भागांकडे दुर्लक्ष करतो ते करणं टाळा.