नारळाचं पाणी - पित्ताचा त्रास कमी करणारा नैसर्गिक उपाय

उन्हाच्या झळा बसत असताना ग्लासभर नारळाचं पाणी तुम्हांला दिलासा देते.

Updated: Mar 9, 2018, 09:27 PM IST
नारळाचं पाणी - पित्ताचा त्रास कमी करणारा नैसर्गिक उपाय   title=

मुंबई : उन्हाच्या झळा बसत असताना ग्लासभर नारळाचं पाणी तुम्हांला दिलासा देते.

शरीरात थंडावा निर्माण करणार्‍या नारळाच्या पाण्याचे काही आरोग्यदायी गुणधर्मदेखील आहेत.  शरीरात  पित्त वाढले असताना नारळाचे पाणी प्यायल्यास त्याचा त्रास कमी होण्यास मदत होते. मळमळ, छातीतील जळजळ कमी होण्यास मदत होते.

कसे ठरते फायदेशीर ? 

नारळाचे पाणी प्यायल्यास शरीरातील अ‍ॅसिड घटकांचे अल्कलाईनमध्ये रुपांतर होण्यास मदत होते. परिणामी अ‍ॅसिडीटीचा त्रास शमवण्यास मदत होते. नारळाच्या पाण्यामध्ये फायबर घटक मुबलक प्रमाणात असल्याने  पित्ताचा त्रास उलटण्याची शक्यता कमी होते. तसेच पोटात थंडावा निर्माण झाल्याने जळजळ कमी होण्यासही मदत होते.

कसा कराल हा उपाय ?

पित्ताचा त्रास रोखण्यासाठी  जेवल्यानंतर अर्धातासाने ग्लासभर नारळाचे पाणी प्यावे.

पोषणयुक्त आहारासोबत नियमित जेवणानंतर 2-3 महिने नारळ्याचे पाणी प्यायल्यास पित्ताचा त्रास कायमस्वरूपी आटोक्यात राहण्यास मदत होईल. सोबतच पचनही सुधारेल.