थंड की गरम? कोणतं दूध आरोग्यासाठी पिणं ठरतं फायदेशीर?

जर तुम्ही रोज दुधाचं सेवन करत असाल तर तुम्हाला एक प्रश्न नेहमी पडत असेल, तो म्हणजे दूध थंड प्यावं की गरम. 

Updated: Oct 5, 2022, 06:27 AM IST
थंड की गरम? कोणतं दूध आरोग्यासाठी पिणं ठरतं फायदेशीर? title=

मुंबई : जर तुम्ही रोज दुधाचं सेवन करत असाल तर तुम्हाला एक प्रश्न नेहमी पडत असेल, तो म्हणजे दूध थंड प्यावं की गरम. तर आज आम्ही तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देणार आहोत. डाएट एक्सपर्ट डॉक्टर रंजना सिंह यांच्या सांगण्यानुसार, दूध थंड असूदे किंवा गरम...दूध हे दोन्ही प्रकारे आरोग्यासाठी फार फायदेशीर ठरतं.

थंड आणि गरम दूधाचे आपले विविध फायदे आहेत. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, दूध थंड प्यावं की गरम हे पूर्णपणे हवामान आणि वेळेवर अवलंबून आहे. 

थंड दूध की गरम दूध

दिवसा किंवा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये थंड दूध पिणं अधिक फायदेशीर आहे. थंड दूधाच्या सेवनाने शरीराची उष्णता कमी होते आणि शरीर आतून थंड होण्यास मदत होते. जर आपल्याला हिवाळ्यात रात्री दूध प्यायचं असेल तर आपण गरम दुधाचं सेवन करू शकता. गरम दूध शरीर उबदार ठेवतं आणि थंडीपासून वाचवतं.

दूधातून मिळणारे पोषक घटक

आहार तज्ज्ञ डॉ. रंजना सिंह यांच्या मते, दूधामध्ये बऱ्याच प्रमाणात पौष्टिक तत्त्व आहे. जे शरीराच्या गरजेनुसार कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, पोटॅशियमची आवश्यकता पूर्ण करतं. 

गरम दूध पिण्याचे फायदे

आहार तज्ज्ञ डॉ. रंजना सिंह यांच्या माहितीनुसार, गरम दूध आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हे पचवणं सोपे आहे. अतिसार, गॅस सारख्या पचनाशी संबंधित समस्या गरम दुधाचं सेवन केल्यावर टाळल्या जाऊ शकतात. गरम दुधात ट्रिपलोफान आणि मेलाटोनिन असतं. यात असणारं अमिनो अॅसिड गरम झाल्यावर सक्रिय होतं. यामुळे रात्री गरम प्यालेले असेल तर झोप चांगली येते.

थंड दूध पिण्याचे फायदे

आहार तज्ज्ञ डॉ. रंजना सिंह यांच्या मते, थंड दुधात कॅल्शियमचं प्रमाण जास्त असतं. यामुळे थंड दूध प्यायल्याने पोटातील जळजळ चिडचिड आणि एसिडीटीपासून आराम मिळतो. यामध्ये इलेक्ट्रोलाइट्स असल्याने हे शरीर हायड्रेटेड ठेवण्यास मदत होते. म्हणून, रात्री थंड दूध न पिण्याचा सल्ला दिला जातो. असं केल्यास खोकला तसंच सर्दी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

दूधासंदर्भात असणाऱ्या गैरसमजुती

डॉ. रंजना सिंह म्हणतात की, काही लोकं दुधाला वजन वाढण्याचं कारण मानतात. मात्र हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. दुधात आढळणारं कॅल्शियम चयापचय वाढवतं, ज्यामुळे शरीरातील कॅलरी वेगाने बर्न होण्यास मदत होतात. एवढंच नाही तर थंड दूध प्यायल्य़ाने पोट बर्‍याच वेळेस भरलेलं राहतं आणि भूक लागत नाही.