कोरोनाचा परिणाम पुरुषांच्या Private part वर होतोय?

 एका व्यक्तीने कोरोनासंदर्भात केलेला दावा अतिशय विचित्र आणि धक्कादायक आहे.

Updated: Jan 13, 2022, 08:48 AM IST
कोरोनाचा परिणाम पुरुषांच्या Private part वर होतोय? title=

अमेरिका : जवळपास गेल्या 2 वर्षांपासून आपण कोरोनाच्या महामारीशी लढतोय. यामध्ये आपल्याला कोरोनोची विविध लक्षणं तसंच दुष्परिणाम दिसून आलेत. दरम्यान यामध्येच आता अमेरिकेत राहणाऱ्या एका व्यक्तीने कोरोनासंदर्भात केलेला दावा अतिशय विचित्र आणि धक्कादायक आहे.

'मिरर'च्या रिपोर्टनुसार, पॉडकास्टवर हा व्यक्ती त्याची कहाणी सांगत होता. यावेळी या व्यक्तीने दावा केला आहे की, कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याचा परिणाम त्याच्या प्रायव्हेट पार्टवर झाला.

या व्यक्ती सांगतो की, "मी 30 वर्षांचा असून गेल्या वर्षी जुलैमध्ये मला कोरोनाची लागण झाली होती. उपचारा घेतल्यानंतर, मला रुग्णालयातून सोडण्यात आलं. यानंतर मला समजलं की, माझा प्रायव्हेट पार्टचा आकार पूर्वीपेक्षा लहान झाला आहे. कोरोनातून बरं झाल्यानंतर मला इरेक्टाइल डिसफंक्शनलाही सामोरं जावं लागलं. दरम्यान हा त्रास औषधांनी बरा झाला पण ही नवीन समस्या निर्माण झाली आहे."

त्या व्यक्तीने पुढे सांगितलं की, संसर्ग होण्यापूर्वी माझ्या प्रायव्हेट पार्टचा आकार सामान्य होता, पण आता पूर्वीच्या तुलनेत त्याचा आकार छोटा झाल्याचं समजतंय. हे व्हॅस्क्युलर डॅमेजमुळे झालं असावं. माझ्या डॉक्टरांनी सांगितलं की, ही समस्या कायम राहील. 

अमेरिकेतील यूरोलॉजिस्ट ऍशले विंटर पॉडकास्टवर बोलताना म्हणाले, "इरेक्टाइल डिसफंक्शनमध्ये संबंधित व्यक्तीचा प्रायव्हेट पार्ट स्ट्रेच होत नाही. खरं तर, जेव्हा एखादी व्यक्ती उत्तेजित असते तेव्हा त्याचा मेंदू त्याच्या प्रायव्हेट पार्टच्या नसांना सिग्नल पाठवतो ज्यामुळे त्याठिकाणी रक्तप्रवाह वाढतो. परंतु ज्यावेळी असं होत नाही तेव्हा ते स्ट्रेच होत नाही आणि परिणामी व्हायव्हेट पार्ट लहान होऊ शकतो."

डॉ विंटर म्हणतात की, हे एक दुर्मिळ प्रकारचं कोरोनाचा दुष्परिणाम आहे, ज्यामुळे प्रायव्हेट पार्टमधील रक्तप्रवाहावर परिणाम होऊ शकतो. यानंतर व्यक्तीला इरेक्टाइल डिसफंक्शन होऊ शकते. 

डॉ विंटर यांनी एका यूरोलॉजिस्टच्या अभ्यासाची माहिती देत सांगितलं की, कोरोनातून पूर्णपणे बरं झालेल्या दोन पुरुषांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये व्हायरसचे ट्रेसेस सापडले. ज्यामुळे त्यांच्या खाजगी जीवनावर परिणाम झाला. नंतर त्यांच्यावर इम्प्लांट सर्जरी करावी लागली.