बापरे! मेडिकलचं शिक्षण घेणाऱ्या 40 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या डॉक्टरांना कोरोनाची लागण होत असल्याचं समोर आलं आहे.

Updated: Oct 10, 2021, 08:09 AM IST
बापरे! मेडिकलचं शिक्षण घेणाऱ्या 40 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

मुंबई : मुंबईमध्ये कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या कमी होताना दिसतेय. मात्र अशातच दुसरीकडे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या डॉक्टरांना कोरोनाची लागण होत असल्याचं समोर आलं आहे. मुंबईतील केईमएम रूग्णालयातील 40 एमबीबीएसचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाल्याने पुन्हा चिंतेत भर पडली आहे. 

गेल्या आठवड्यात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या 20 विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या आढळल्यालं होतं. त्यानंतर वसतिगृहांमधील सर्व विद्यार्थ्यांच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर लागण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढून आता 40 पर्यंत पोहोचली आहे.

तर शनिवारी राज्यात 2 हजार 486 नवीन कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत. दुसरीकडे, 2 हजार 446 रूग्ण कोरोनामुक्त झाल्याची माहिती आहे. याशिवाय 44 कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे

त्याचप्रमाणे राज्यात आजवर एकूण 63,99,464 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतल्याची माहिती आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 97.32 टक्के एवढे झालं आहे.