Social Mediaमध्ये कैद तुमचं मानसिक आरोग्य... या कारणांमुळे तुमची मानसिक स्थिती ढासाळते आणि तुम्ही जगापासून वेगळे होता

सोशल मीडिया आपल्या जीवनातील सर्व मोठ्या आणि छोट्या गोष्टीमध्ये अविभाज्य भूमिका बजावत आहे, तेव्हा ते आपल्या आरोग्यापासून देखील कसे लांब राहू शकते? 

Updated: Oct 9, 2021, 01:49 PM IST
Social Mediaमध्ये कैद तुमचं मानसिक आरोग्य... या कारणांमुळे तुमची मानसिक स्थिती ढासाळते आणि तुम्ही जगापासून वेगळे होता title=

मुंबई : सोशल मीडियावरती आपल्या खूप काही गोष्टी पाहायला मिळताता आपलाला ते दिवस भराच्या घडामोडी बाबत अपडेट देखील ठेवतं. तुम्हाला त्यावरुन आपल्या मित्रांशी बोलता येतं किंवा नवीन मित्र देखील बनवता येतात, येवढंच काय तर सोशल मीडियामध्ये तुमचं मनोरंजन करण्याची क्षमता देखील आहे. त्यामुळे आपण त्यावर तासंतास बसून असतो. व्हिडीओ, फोटो, मीम्स, चॅट हे सगळं सोशल मीडियावर आपण नेहमी करतो. परंतु तुम्हाला हे माहित आहे का? की तुम्हाला हे सगळं जरी नॉर्मल वाटत असलं तरी हे नॉर्मल नाही. त्यामुळे तुमच्या घरातील व्यक्ती किंवा तुम्हाला सतत सोशल मीडियावर असण्याची सवय लागली आहे तर याबद्दल काही माहिती जाणून घ्या.

जेव्हा सोशल मीडिया आपल्या जीवनातील सर्व मोठ्या आणि छोट्या गोष्टीमध्ये अविभाज्य भूमिका बजावत आहे, तेव्हा ते आपल्या आरोग्यापासून देखील कसे लांब राहू शकते? त्यामुळे सोशल मीडियाचा खरंच आपल्या आरोग्यावर परिणाम होतो का? असा जर तुमचा प्रश्न असेल तर, त्याचे साधे आणि सोपे उत्तर आहे- होय!

सोशल मीडियामुळे तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो आणि याची तुम्हाला जाणीव देखील नसते.

15 जून 2020 रोजी NCBI वर प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, सोशल मीडियाचा अतिवापर तुमच्या मानसिक आरोग्याला कैद करत आहे आणि तुम्हाला नैराश्य, चिंता आणि तणाव इत्यादींचा बळी बनवत आहे. ज्यामुळे झोपेची कमतरता (निद्रानाश), मधुमेह, हृदय आणि मेंदूच्या आजारांचा धोका लक्षणीय वाढतो.

अमेरिकेच्या मॅक्लीन हॉस्पिटलचे म्हणणे आहे की, सोशल मीडियाचा वापर करून डोपामाइन हार्मोन आपल्या मेंदूत तयार होतो. या संप्रेरकाला 'फील-गुड केमिकल' म्हणूनही ओळखले जाते, याचा अर्थ असा की, सोशल मीडिया वापरल्याने तुम्हाला चांगले वाटते. परंतु आपण यामुळे आपल्या जवळच्या व्यक्तीला भेटणे, त्याच्यासोबत अन्न खाणे, गेम खेळणे, टाळतो. तुम्ही हे पाहिलं असेल की आपल्यापैकी बहुतेक लोकं बाहेर फिरायला गेलं तरी त्या ठिकाणाच्या निसर्गाचा किंवा तेथील अन्नाचा आनंद घेण्याएवजी आपण पहिलं फोटो काढण्यात बिजी होतो आणि ते लगेच सोशल मीडियावर टाकतो.

परंतु तुमच्या हे लक्षात येतंय का की, असं करताना तुम्ही त्या गोष्टीचा आनंद घ्यायला विसरता. फोटो काढून तुम्ही त्या ठिकाणाला स्मरणात तर ठेवता पण त्याव्यतीरिक्त तुम्ही खरंच त्या ठिकाणची मेमरी तयार करता का? तुमच्यासमोरील व्यक्तीसोबत तुम्ही वेळ घालवता का? बरं हे आपल्या पूरतं सिमीत राहत नाही तर हे तुम्ही लक्षात घ्या की आपल्या वागण्यामुळे दुसऱ्याला ही त्रास होऊ शकतं.

आता तुम्ही म्हणाल माझ्या वागण्याचा किंवा सोशल मीडियावर फोटो टाकण्याचा दुसऱ्यांवरती कसा काय परिणाम होतो? तर याचं कारण आहे FOMO.

FOMO काय आहे?

FOMO म्हणजे फीअर ऑफ मिसिंग आऊट. ही एक थेअरी आहे. ज्यामध्ये असे सांगितले जाते की, यामुळे व्यक्ती नैराश्यात जाते किंवा व्यक्ती तणावात येते.

DATAREPORTAL नुसार 2020 ते 2021 दरम्यान भारतात सोशल मीडिया वापरणाऱ्या लोकांची संख्या 7 कोटी 80 लाखांनी वाढली आहे. लॉकडाऊन हे त्यामागील एक कारण आहे परंतु त्यामागे FOMO ची थेअरी आहे.

उदाहरण द्यायचं झालं तर, लॉकडाऊनदरम्यान घरी असलेल्या लोकांना FOMOमुळे आपण कुठे तरी मागे पडतोय का? आपण काही तरी मिस करतोय का? ही भिती होती, ज्यामुळे लोकं सतत सोशल मीडिया चेक करत होते आणि त्यामध्ये आपण आपल्या मित्रांना काही तरी चांगली गोष्टं करताना पाहायचो. तेव्हा आपल्याला ती गोष्ट शक्य नाही किंवा आपण ती करु शकत नाही यामुळे तणावात यायाचा.

आपल्याला हे जाणवत नाही परंतु आपल्या मनात हे विचार सुरू असतात. आपण विचार करु लागतो की, आपल्याला हे करायला मिळलं असतं तर? किंवा माझ्या आयुष्यात मला असं कधी करायला मिळणार नाही का? लोकांना असे वेगवेगळे प्रश्न पडतात, ज्यामुळे त्यांच्या मनात तणाव वाढतो आणि हेच कारण आहे की आपण देखील समोरच्या व्यक्तीला तणावात आणू शकतो.

आता विचार करा तुमचा मित्र किंवा मैत्रिण लॉकडाऊननंतर कुठे बाहेर फिरायला गेला आणि त्यांनी तिकडचे फोटो सोशल मीडियावरती टाकले. तुम्हाला ही त्या ठिकाणी फिरायला जाण्याची इच्छा होती, ज्यामुळे तुम्हाला वाईट वाटू शकते. कारण तुम्हाला आधी तेथे जायचं होतं.

त्याव्यतीरिक्त समजा कोरोनामुळे तुनचा जॉब देखील गेला आहे ज्यामुळे तुमचं साध जगणं देखीस कठीण झालं आहे आणि त्यात तुम्ही तुमच्या मित्राचे सहलीचे फोटो पाहिलात तर? तर अशावेळी तुमच्या मनात शंभर प्रश्न उपस्थित राहातील तुम्ही आधीच पैशांमुळे दु:ख आणि तणावात आहाता त्यात तुम्ही आता लवकर फिरायला काही जाऊ शकतं नाही, मगं तेव्हा तुम्हाला वाटतं की अरे माझ्यासोबतचं असं का होतं? माझ्या आयुष्याचा काय उपयोग? माझं जगणं व्यर्थ आहे. ज्यामुळे आपला तणाव वाढतो आणि आपण डिप्रेशनमध्ये येतो. 

दुसरं उदाहरण म्हणजे सोशल मीडियावर आपले फोटो किंवा व्हिडीओ शेअर केल्यावरती लाईक्स किंवा कमेंट्स केलेली संख्या पाहाता, जर समोरील व्यक्तीकडे खूप जास्त लाईक्स असतील आणि आपल्या पोस्टवर कमी लाईक्स असतील तरी देखील लोकांना तणाव येतो, ज्यामुळ ते आपली तुलना समोरील व्यक्तीशी करु लागतात ज्यामुळे आपण खूप विचार करतो आणि त्यामुळे आपल्या आजारी असल्यासारखं वाटतं.

परंतु तुम्हाला हे माहित आहे का? डिप्रेशनमध्ये आल्याने आपलं मानसिक आरोग्य बिघडतं, ज्यामुळे शारीरिक समस्यांचा धोका वाढतो.

2018 च्या ब्रिटीश अभ्यासानुसार, सोशल मीडियाच्या अति वापरामुळे झोपेची कमतरता, व्यत्यय किंवा विलंब होऊ शकतो. ज्यामुळे उदासीनता, स्मरणशक्ती कमी होणे, मानसिक क्षमता कमी होणे इत्यादी समस्या उद्भवू शकतात. मानसिक आणि पोटाचे आरोग्य बिघडल्यामुळे मळमळ, डोकेदुखी, स्नायूंचा ताण इत्यादी समस्या वाढण्याचा धोकाही संशोधकांनी वर्तवला आहे.

त्यामुळे तुम्हाला देखील हे पटत असेल तर सोशल मीडियापासून थोडं लांब राहा.

मानसिक आरोग्यावर सोशल मीडियाचा नकारात्मक प्रभाव कसा कमी करायचा?

जर तुम्हाला तुमचे मानसिक आरोग्य सोशल मीडियाच्या नकारात्मक प्रभावापासून दूर ठेवायचे असेल तर खालील टिप्स नक्की पाळा.
-सोशल मीडियापासून विश्रांती घ्या.
-सोशल मीडिया वापरत नसताना, अॅप नोटीफिकेशन बंद करा.
-तुमच्या सोशल मीडिया अकाऊंट्समधून तुमच्यासाठी नकारात्मक असणाऱ्या लोकांना काढून टाका.
-सोशल मीडिया वापरण्यासाठी वेळ ठरवा.
-आपला आनंद सोशल मीडियाच्या बाहेर शोधा.
-मित्र किंवा कुटुंबासह फिरायला जा पण सोशल मीडियाचा वापर करु नका. शक्य़तो फोटो देखील शेअर करु नका.