मुंबई : जगभरात कोरोना व्हायरस कहर थांबण्याचं नाव घेत नाहीये. कोरोनाचा प्रभाव संपतोय असं लक्षात येत असताना नवीन व्हेरिएंट समोर आलेत. सध्या कोरोना व्हायरसच्या चौथ्या लाटेची भीती व्यक्त केली जातेय. अशातच आता भारतात एक लस तयार केली जातेय जी उन्हाळ्याच्या दिवसांतही राखून ठेवता येणार आहे.
याचा अर्थ ही लस ठेवण्यासाठी कोल्ड स्टोरेजची गरज भासणार नाही. ही लस Omicron, Delta, XE सारख्या सर्व व्हेरिएंटविरूद्ध प्रभावी असणार आहे. यामध्ये मजबूत अँटीबॉडी निर्माण करण्याची क्षमता आहे. उंदरांवर केलेल्या अभ्यासात ही बाब समोर आली आहे.
बंगळूरूमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आणि बायोटेक स्टार्ट-अप कंपनी Mynvax एक लस तयार करतेय. या लसीमध्ये व्हायरल स्पाइक प्रोटीनचा एक भाग वापरण्यात आला आहे. याला रिसेप्टर-बाइंडिंग डोमेन म्हणतात.
त्याच वेळी, ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेका लस 2 ते 8 अंश सेल्सिअस तापमानात ठेवावी लागते. ही लस भारतात Covishield म्हणून वापरली जाते. तर फायझर लसीसाठी मायनस 7 अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमान आवश्यक आहे.
या लसीसंदर्भात केलेल्या स्टडीमध्ये असं म्हटलं आहे की, उंदरांवर या लसीची टेस्ट केली आहे. या संशोधनातून असं समोर आलं आहे की, डेल्टा आणि ओमायक्रॉन सारख्या सर्व व्हेरिएंटवर अंटीबॉडीज तयार करण्यासाठी सक्षम आहे.