Coronavaccine : कोरोना व्हॅक्सीनवर लागणार 5% GST, खासगी रूग्णालयातील दर ठरले

लसीकरणासाठी नव्या गाइडलाइन्स 

Updated: Jun 9, 2021, 06:42 AM IST
Coronavaccine : कोरोना व्हॅक्सीनवर लागणार 5% GST, खासगी रूग्णालयातील दर ठरले  title=

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आता पुन्हा एकदा जनजीवन सुरळीत होत आहे. या परिस्थितीत सगळ्यांचा कल हा कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्या करता आहे. अशावेळी आरोग्य मंत्रालयाने खासगी रूग्णालयात कोरोना व्हॅक्सीनचे दर ठरवले आहेत. सरकारने कोरोना प्रतिबंधात्मक लसीवर GST आकारत आहे. (Corona Vaccine : Centre caps vaccine rates in private hospitals, here how much they will cost now) एका व्हॅक्सीनमागे 5% GST आकारले जाणार आहे. 

कोविशील्ड लसीचा दर हा 780 रुपये प्रति डोस आहे. तर कोव्हॅक्सीनचा दर हा 1410 रुपये प्रति डोस आहे. तर स्पूतनिक-व्ही चा दर हा 1145 रुपये प्रति डोस आहे. सरकारने कोरोना प्रतिबंधात्मक लसीवर GST आकारत आहे. एका व्हॅक्सीनमागे 5% GST आकारले जाणार आहे. तसेच प्रत्येक डोसवर 150 रुपये प्रति डोस सर्विस चार्ज आकारला जाणार आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली आहे की, 21 जूनपासून सर्व राज्यात मोफत कोरोना प्रतिबंधात्मक लस मिळणार आहे. केंद्र सरकार व्हॅक्सीनची सेवा पुरवण्यासाठी ऍक्शन मोडमध्ये आली आहे. आरोग्य मंत्रालयाने आपल्या पत्रकार परिषदेत 74 कोटी लसीची ऑर्डर जाहीर केली आहे. यामध्ये 25 करोड कोविशील्ड आणि 19 करोड कोवॅक्सीनच्या डोसचा समावेश आहे. सरकारने ई-बायोलॉजिकल लिमिटेडचे लसीचे 30 करोड डोस खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत. जे सप्टेंबरपर्यंत उपलब्ध होतील. सरकारने या कंपन्यांची ऑर्डर 30 टक्के रक्कम आधी देऊन केली आहे. 

लसीकरणाच्या नव्या गाइडलाइन्सवर वीके पॉल यांनी सांगितलं की, 'गाइडलाइनमध्ये 75% लस केंद्र प्रोक्योर करणार आहे. राज्यांना मोफत लस दिली जाणार आहे. राज्याची लोकसंख्या, संक्रमणाची परिस्थिती आणि राज्यात लस कोणत्या पद्धतीने दिले जाते यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असल्याचं सांगण्यात आलं.' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी घोषणा केली की, योग दिवस म्हणजे 21 जूनपासून राज्यात मोफत लस देण्यात येणार आहे.